Pune Corporation | महापालिकेच्या व्यावसायीक मिळकतींचा भाडेदर 2.5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढविला; पाचपट भाडेवाढीमुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | एकिकडे महापालिकेने (Pune Corporation) बांधलेले अनेक व्यावसायीक गाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. अशातच प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी 12 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने छोट्या व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत.

 

महापालिकेने (Pune Corporation) गेल्या अनेक वर्षात शहराच्या विविध भागात व्यावसायीक गाळे बांधले आहेत. यापैकी बहुतांश गाळे अगदी 25 चौ. फूटांपासून 50 चौ. फूटांपर्यंतचे आहेत. पुर्वीपासून महापालिका निविदा काढून गाळे भाडेपट्ट्याने देण्याची प्रक्रिया राबवत असते. परंतू अनेक गाळे हे व्यावसायीकदृष्टया गर्दीच्या ठिकाणी नसल्याने या निविदांना प्रतिसादही मिळत नाही. भाडेदर ठरविताना गाळ्याच्या मिळकतीच्या किंमतीच्या अडीच टक्के भाडे आकारणी करण्यास मान्यता आहे. तर 1998 मध्ये स्थायी समितीने भाडेदर हा मिळकतीच्या प्रियिमच्या 12 टक्के असावा असा ठराव मंजूर केला आहे. या दोन्हीमध्ये विसंगती असल्याने 2010 मध्ये शहर अभियंता कार्यालयाने महापालिकेचे आर्थिक हित विचारात घेउन वरिलपैकी जे जास्तीचे अर्थात 12 टक्के दराने भाडेदर आकारण्यात यावा असा अभिप्राय दिला आहे. मात्र, यावर दीर्घकाळ निर्णय झाला नव्हता.

 

दरम्यान, मालमत्ता विभागाने यावर्षी गाळेधारकांना 12 टक्के दराने भाडेदर आकारणी केली. तशा नोटीसही पाठविल्या. त्याला प्रचंड विरोध सुरू झाला आहे. आतापर्यंत अडीच टक्के दराने भाडेवाढ होत असताना अचानक 12 टक्के दराने भाडे देण्यास अनेक व्यावसायीकांनी असमर्थता दर्शविली आहे. विशेष असे की मागीलवर्षी मार्चपासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प असताना छोट्या व्यावसायीकांना दिलासा देण्याऐवजी पाचपट भाडेवाढ करण्यात आली. यामुळे अनेकांनी महापालिका (Pune Corporation) प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे तक्रारही केली. यानंतर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने विधी विभागाचा अभिप्राय मागविला. विधी विभागाने 2008 च्या मिळकत वाटप नियमावलीमध्ये मिळकतीच्या प्रिमियमच्या अडीच टक्के भाडे ठरवून भाड्याची रक्कम अडीच टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही, अशी तरतूद असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्थायी समितीच्या ठरावात नमूद केलेल्या 12 टक्के दरापेक्षा भाडेदर कमी नसावा असे स्पष्टीकरण दिले. भाड्याची रक्कम कमीत कमी 12 टक्के किंवा निविदा मागवून 12 टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशी भाड्याची रक्कम ठरवता येईल, असे अभिप्रायात नमूद केले.

 

या अभिप्रायानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये व्यावसायीक वापरासाठी मुल्यांकनाच्या 12 टक्के दराने भाडे आकारणी करून
निविदा प्रक्रिया राबविणे. निविदा राबवूनही प्रतिसाद न मिळालेल्या मिळकतींच्या विनियोगासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात यावे.
मिळकत वाटप नियमावली 2008 मधील काही तरतुदीं सद्यस्थितीत विचारात घेउन त्यामध्ये बदल करण्याची आवश्यक्ता आहे.
तसेच वाटप करायच्या मिळकतींचे शासन धोरणानुसार प्राधान्यक्रम ठरवून वाटप करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Increased the rental rate of commercial property of the corporation from 2.5 per cent to 12 per cent; Outrage among small businesses over five-fold fare hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी मिळणार? महापालिका प्रशासन म्हणते…

Pune Corporation | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या 63 कर्मचार्‍यांचे वारस अद्याप मदतीपासून ‘वंचित’; तातडीने वारसांना मदत द्यावी – पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनची प्रशासनाकडे मागणी

Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर