Pune Corporation | अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या ‘त्या’ बड्या राजकिय कार्यकर्त्यावर गुन्हा नाही ?, उलटसुलट चर्चा सुरू

0
81
Pune Corporation Isnt there a crime against those big political activists who beat up the employees of the anti encroachment squad
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | धानोरी (Dhanori) येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान महापालिकेच्या कर्मचार्‍यांना (PMC Anti Encroachment Squad) मारहाण झाल्यानंतरही आज महापालिकेच्या (Pune Corporation) पथकाने जोरदार कारवाई केली. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यांविरोधात गुन्हाही (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. मात्र, मारहाणीमध्ये सहभागी असलेल्या एका बड्या ‘राजकिय’कार्यकर्त्याला कारवाईतून वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

पुणे महापालिकेने वाहतुक गतीमान करण्यासाठी मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईमध्ये इमारतींच्या ओपन स्पेसवर करण्यात येणारी अतिक्रमणेही काढण्यात येत आहेत. काल धानोरी येथे कारवाई दरम्यान काही व्यावसायीकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांणा बेदम मारहाण केली. यामध्ये एक कर्मचारी जखमीही झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखिल दाखल करण्यात आला आहे. (Pune Corporation)

दरम्यान, कारवाई दरम्यान महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे.
यामध्ये धानोरी परिसरातील एक बडा कार्यकर्ताही मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
परंतू प्रत्यक्षात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने कठोर भुमिका घेत गुन्हा दाखल केल्यानंतर या कार्यकर्त्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करू नये यासाठी महापालिकेच्या अधिकार्‍यांना मिन्नतवार्‍या केल्या.
त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही, अशी चर्चा वडगाव शेरी मतदारसंघामध्ये (Vadgaon Sheri Vidhan Sabha) आहे.

 

याप्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता घटनेच्यावेळी करण्यात आलेल्या छायाचित्रणाचा आधार घेउन मारहाण करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.
यामधून कोणी सुटणार नाही असे सांगितले.

 

Web Title :- Pune Corporation | Isnt there a crime against those big political activists who beat up the employees of the anti encroachment squad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा