Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेळेत काम न केल्याने महापालिकेच्या (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाने जैन इरिगेशन सिस्टिम लि. (jain irrigation systems ltd) आणि मे. एसपीएमएल (SPML Infra Limited) या जॉईंट व्हेंचरचे काम महापालिकेने (Pune Corporation) सव्वावर्षापुर्वी काढून घेतले. परंतू याबाबत ही कंपनी आर्बिट्रेशनमध्ये गेल्यानंतर आर्बिट्रेशननेे कंपनीच्याच बाजूने निकाल देत महापालिकेने सुमारे ६४ कोटी रुपये कंपनीला देण्याचे आदेश दिले. यामुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने (pmc administration) पुन्हा कंपनीची समजूत घालत ९ कोटी रुपये आणि काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने या प्रकल्पासाठी नेमलेली सल्लागार कंपनीचा ‘फोलपणा’ पुन्हा एकदा उघड झाला आहे. दरम्यान, या कंपनीला पैसे आणि काम सुरू करण्यास परवानगी देण्याचा ठराव आज स्थायी समितीमध्ये (pmc standing committee) मंजुर करण्यात आला.

 

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेने (Pune Corporation) पाईपलाईनच्या कामाच्या पाच पॅकेजमध्ये निविदा काढल्या होत्या. यापैकी चार पॅकेज एल ऍन्ड टी कंपनीला (L & T company pune) तर चवथ्या क्रमांकाचे कोंढवा-वानवडी (Kondhwa-Wanwadi) भागातील एक पॅकेज जैन इरिगेशन सिस्टिम लि. आणि मे. एसपीएमएल या जॉईंट व्हेंचर कंपनीला मिळाले होते. मार्च २०१८ मध्ये या कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली होती. या कंपनीने कामाला सुरूवात केली. मात्र, करारानुसार कामाचा अपेक्षित वेग राखू न शकल्याने जुलै २०२० मध्ये या कंपनीचे काम काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच बयाणा रक्कम जप्त करून ४५ लाख रुपये दंड ठोठावला होता. याविरोधात कंपनी आर्बिस्ट्रेशनमध्ये गेली. आर्बिस्टे्रेशनमध्ये कंपनीच्याच बाजूने निकाल लागला असून महापालिकेने (Pune Corporation) त्यांना ६४ कोटी रुपये द्यावेत, असे आदेश दिले.

याविरोधात न्यायालयात दाद मागण्याऐवजी प्रशासनाने कंपनीसोबत तडजोड केली. कोरोनामुळे वाया गेलेला वेळ, स्टील, सिमेंट आदी वस्तुंच्या वाढणार्‍या किंमती यामुळे प्रकल्पाला विलंब तर होणारच परंतू खर्चही मोठ्याप्रमाणावर वाढेल, यामुळे प्रशासनाने कंपनीसोबत तडजोड करायची भुमिका घेतली. या तडजोडीमध्ये दंडात्मक कारवाई, बयाणा रक्कम जप्तीची कारवाई तसेच निविदा रद्दची कारवाई मागे घेउन काम सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जॉईंट व्हेंचरमधून एसपीएमएल या कंपनीचे नाव काढून घेत नवीन करार करणे. कराराच्या तारखेपासून ४८ महिन्यांत काम पुर्ण करणे आदीवर एकमत झाले. तसेच आतापर्यंत झालेल्या कामाचे पहिले व दुसरे रनिंग बिल ५.५ टक्के व्याजदराने सुमारे ९ कोटी रुपये कंपनीला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिल सर्व गोष्टींचा समावेश असलेला प्रस्ताव आज मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. त्याला आज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasane) यांनी सांगितले.

 

सल्लागाराने पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी एस.जी.आय. ही सल्लागार कंपनी नेमण्यात आली होती.
या कंपनीने सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे एस्टीमेट दोन हजार कोटी रुपयांहून २ हजार ६०० कोटी रुपयांपर्यंत फुगविले होते.
प्रत्यक्षात निविदा चढ्या दराने अर्थात तीन हजार कोटी रुपयांच्यावर आल्या होत्या.
एल. ऍन्ड टी. (L & T) ही एकमेव कंपनी डोळ्यासमोर ठेवून या सल्लागार कंपनीने काम केल्याचे आरोप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते.
यानंतर प्रशासनानेच केबल डक्टचे काम वगळून तसेच काही तांत्रिक बदल केल्यानंतर काढलेल्या निविदा २ हजार कोटी रुपयांच्या आतमध्ये आल्या.
पाच पॅकेजमधील चार पॅकेजची कामे एल.ऍन्ड टी. या कंपनीला मिळाली तर एक पॅकेज जैन इरिगेशनला मिळाले.
एल.ऍन्ड टी. कंपनीचे काम गतीने सुरू राहीले मात्र जैन इरिगेशनचे काम पहिल्यापासूनच संथ राहीले.

त्यामुळे दोनच वर्षात या कंपनीचे काम काढून घेण्यात आले.
या विरोधात जैन इरिगेशन आर्बिट्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांच्याच बाजूने निकाल लागल्यामुळे निविदा काढतानाच्या अटी शर्तींमध्येच त्रुटी असल्याबाबतचा संशय अधिकच बळावला आहे.
विशेष असे की यावर्षीच्या सुरवातीला एस.जी.आय. कंपनीनेही या प्रकल्पाचे काम सोडत असल्याचे पालिकेला कळविले आहे.
दरम्यान, जैन इरिगेशन सिस्टिम लि. व एसपीएमएल कंपनीने जॉईंट व्हेंचर केल्याने ते निविदा प्रक्रियेत पात्र ठरले होते.
मात्र, आता पुन्हा नव्याने प्रस्तावाला मंजुरी देताना एसपीएमएल कंपनीला वगळण्यात आल्याने जैन इरिगेशनच्या ‘पात्रते’चा प्रश्‍न ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Web Title :- Pune Corporation | Jain Irrigation Company dominates PMC! Decision to reschedule the canceled 24-hour water supply scheme to the same company SPML Infra Limited-L & T company pune corporation hemant rasane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)