Pune Corporation | पुणे महापालिकेचा जायका प्रकल्प अखेर मार्गी; नदीच्या प्रवाहासह नदीकाठची जैवसाखळी अबाधित राहण्यास होणार मदत

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  आवश्यक क्षमतेअभावी शहरातील अतिरिक्त सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते. त्यामुळे आगामी 25 वर्षांची गरज लक्षात घेऊन 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी, या उद्देशाने पुणे महापालिकेला (Pune Corporation) आवश्यक ती यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (जेआयसीए) (JICA) अर्थात ‘जायका’(Jayka Project) या संस्थेकडून अल्प व्याजदराने 990 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी 85 टक्के रक्कम पुणे महापालिकेस (Pune Corporation) अनुदान म्हणून देऊ केली आहे.

100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया

महापालिकेने पहिल्या टप्प्यापाठोपाठ 2036 व 2046 पर्यंतच्या लोकसंख्येचा (population)अंदाज बांधून त्यानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतावर्धनाचा आराखडाही तयार केला असून 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाचे पहिल्या टप्पातील काम लवकरच सुरु होईल.
यामुळे प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट नदीपात्रात जाणार नाही पण त्याचबरोबर नदीच्या प्रवाहासह नदीकाठची जैवसाखळी अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

 

567 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया

शहरातील आंबिल ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला व कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या
सहा प्रमुख ओढ्या-नाल्यांमधून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना),
नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड या 10 ठिकाणी एकूण 567 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत.
शहरात प्रतिव्यक्ती जितके पाणी पुरविले जाते, त्याच्या साधारण 80 ते 85 टक्के पाणी हे सांडपाणी म्हणून बाहेर टाकले जाते, असे शास्त्रीय मानांकन आहे.

शहरात 10 सांडपाण्याचे प्रकल्प

सध्या अंदाजे 1000 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणीपुरवठ्या नुसार (water supply) दररोज 750 ते 850 एमएलडी सांडपाणी निर्माण होते.
शहरातील १० ठकाणी सांडपाण्याचे प्रकल्प असले तरी शहराबाहेरील नाले आणि प्रवाहांमधूनही सांडपाणी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले.
त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (Sewage Treatment Project) संख्या वाढवून क्षमतावर्धन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार महापालिकेने नव्या पायाभूत सुविधांसह इतर आवश्यक त्या उपाययोजना तसेच सांडपाणी निर्मितीच्या मूलभूत नकाशासह सांडपाणी एकत्रित करण्याचे व प्रक्रिया करण्याचे विभाग निश्चित केले
व सांडपाणी प्रक्रियेतील सुधारणांचा समावेश असणारा सविस्तर प्रकल्प अहवाल ‘राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालया’समोर (National River Conservation Directorate) मांडण्यात आला.

 

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे

त्या अहवालात पुणे शहराची (Pune City) 2026 मध्ये लोकसंख्या 64.58 लाखांवर, तर 2046 मध्ये 98.59 लाखांवर जाईल.
असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 2026 पर्यंत 364 एमएलडी, तर 2046 पर्यंत 759 एमएलडी इतक्या अतिरिक्त क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
अशी सूचना महापालिकेने केली होती. परंतु तेवढ्या प्रमाणात ‘एनआरसीडी’कडे निधी उपलब्ध होणे अशक्य होते.
त्यामुळेच केंद्र सरकारने ‘जायका’कडून अल्प दराने कर्ज घेऊन ते महापालिकेस अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar)
यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता.

लाभदायक ठरणारा प्रकल्प

यासंदर्भात बोलताना सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) म्हणाले, पुण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प मार्गी लागला आहे.
हा एक नवा अध्याय असून पुण्याच्या भविष्यातील आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणासाठी लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आहे.

 

Web Title : Pune Corporation | jica project from pune municipal corporation has finally started

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्ताव, आता तरी पुणेकरांना न्याय मिळेल का?, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

Pune Corona Restrictions | पुणे व्यापारी महासंघाचा इशारा, अजित पवारांनी निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून…

PM Mandhan Yojana | केवळ 55 रुपयांची बचत केल्यानंतर मोदी सरकार दरमहिना देईल 3000 रुपये, जाणून घ्या