Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यावर आमदार मुक्ता टिळकांची नाराजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | बाजीराव रस्त्यावरील (Bajirao Raod, Pune) उड्डाणपुलाच्या कामाच्या निधीचे छत्रपती शिवाजी रस्त्याच्या (Shivaji Raod, Pune) डांबरीकरणासाठी वर्गीकरणावरून स्थानीक नगरसेवक माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ‘ठिणगी’ पडली आहे. (Pune Corporation)

 

आमदार मुक्ता टिळक यांनी यासंदर्भात पत्र प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बाजीराव रस्त्यावर उड्डाणपुल उभारण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतू रस्त्याची रुंदी कमी असल्याने तांत्रिकदृष्टया उड्डाणपुल उभारणे अशक्य असल्याने यापैकी १ कोटी रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वर्गीकरण करून देण्याचा प्रस्ताव त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रशासनाला दिला होता. परंतू प्रशासनाने त्यावेळी निधीची गरज नाही, असे सांगितले. मात्र, नुकतेच निधी वर्गीकरण करून मिळावा अशी मागणी केली. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांच्याशी वर्गीकरणाबाबत चर्चा करून तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. परंतू स्थायी समितीने वर्गीकरण करण्यास नकार देउन प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला. (Pune Corporation)

 

यावरुन प्रशासन व स्थायी समिती नागरिकांच्या गैरसोयीबाबत गंभीर नाही, असेच दिसते. छत्रपती शिवाजी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. मला कोणत्याही श्रेयवादाची लढाई लढायची नाही. स्थायी समिती व प्रशासनाने त्यांच्यातील हेवेदावे मिटवावे आणि रस्त्यांची कामे तातडीने करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असेही टिळक यांनी पत्रात नमूद केले आहे.

…म्हणून वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला नाही – हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष
या कामासाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद होती. मी सतत आढावा घेतल्यानंतर साडेसहा कोटी रुपये लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
यासाठी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतून व ड्रेनेज विभागातून ही रक्कम उपलब्ध करून प्रशासनाने काम सुरू केले.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधीचे या कामासाठी वर्गीकरण स्थायी समितीमध्ये मान्य केले
असते तरी ते फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत अंतिमत: मान्य झाले असते.
तोपर्यंत काम थांबवून ठेवावे लागले असते. त्यामुळेच वर्गीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला नाही.

 

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष.

 

Web Title :- Pune Corporation | MLA Mukta Tilak’s displeasure with Standing Committee Chairman Hemant Rasane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | सराईत वाहनचोराला खडक पोलिसांकडून अटक, 2 लाखांची वाहने जप्त

 

Pune Corona Updates | दिलासा ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 7410 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी