Pune Corporation | मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली ! महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली बाजू; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मोबाईल टॉवर मिळकतकर (mobile tower property tax) वसुली संदर्भात पुणे महापालिकेने (Pune Corporation) केलेल्या अंतरिम याचिकेसह आतापर्यंत प्रलंबित असणार्या सर्व दाव्यांवर आज उच्च न्यायालयात न्यायाधीश अमजद सय्यद (Judge Amjad Syed) आणि न्यायाधीश शिवकुमार डिगे (Judge Shivkumar Dige) यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) ज्येष्ठ विधिज्ञ प्रसाद डाके-पालकर (Senior lawyer Prasad Dake-Palkar) यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली.

आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) या संदर्भातील सुनावणीला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, कर विभागाच्या प्रमुख विलास कानडे (vilas kanade pmc) , विधी
विभागाच्या प्रमुख अ‍ॅड. निशा चव्हाण (Adv. Nisha Chavan), अ‍ॅड. अभिजीत कुलकर्णी (Adv. Abhijeet Kulkarni), अ‍ॅड. विश्वनाथ पाटील (Adv. Vishwanath Patil) यांची उपस्थिती होती.

 

रासने म्हणाले, ‘या संदर्भात पुणे महापालिकेने (Pune Corporation) अंतरिम याचिका दाखल केली आहे. तसेच योग्य प्रकारे करआकारणी केलेली नाही अशा आशयाच्या १३ याचिका मोबार्इल कंपन्यांनी दाखल केल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ प्रसाद डाके-पालकर यांनी मोबाईल कंपन्यांच्या वकीलांनी करआकारणी संदर्भात केलेले सर्व आरोप पुराव्यानिशी खोडून काढले.
महाराष्ट्र महापालिका कायद्याप्रमाणे करआकारणीची जी तरतूद आहे त्याप्रमाणेच कर आकारल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तो नियमानुसार असल्याने भरावाच लागेल असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
मोबाईल कंपन्यांच्या वतीने बाजू मांडणार्या विधिज्ञ अनिल अंतुरकर सुनावणीची पुढील तारीख मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २० ऑक्टोबर तारीख दिली.’

रासने पुढे म्हणाले, ‘मोबाईल टॉवरवर मिळकतकर आकारण्यात यावा असा निर्णय सन २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
या कर आकारणीचा दर काय असावा, ती कधीपासून करण्यात यावी, ती पूर्वलक्षी असावी का, अनधिकृत मोबाईल टॉवरबाबत काय धोरण असावे आदी विषयांवर काही मोबाईल कंपन्या उच्च न्यायालयात गेल्या होत्या.
सर्व महापालिकांची सुनावणी सन २०२० मध्ये होणे अपेक्षित होते.
परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत सुनावणी वारंवार पुढे गेली.’

 

पुढे म्हणाले, ‘स्थायी समितीचा अध्यक्ष या नात्याने मी समितीच्या आणि विधी समितीच्या बैठकीत
सातत्याने या विषयावर चर्चा घडविली.
महापालिकेचा महसूल वाढण्यासाठी या विषयाचे महत्त्व विषद केले.
अन्य महापालिकांच्या सुनावणीची वाट न पाहता पुणे महापालिकेने स्वतंत्र अंतरिम याचिका दाखल
करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.’

रासने पुढे म्हणाले, ‘मोबाईल टॉवरच्या मिळकतकर वसुलीचा विषय गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरात २१ कंपन्यांचे २८०० मोबाईल टॉवर आहेत.
व्याजासह कंपन्यांकडे सुमारे १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.
जुनी आणि नवी थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.’

 

Web Title : Pune Corporation | Mobile tower income tax recovered! Municipal Corporation in the High Court; Information of Standing Committee Chairman Hemant Rasane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं’ – चित्रा वाघ

Mumbai Crime | ‘सेक्स टॉय’ आणि ‘अंतर्वस्त्रे’ पाठवून दिला जातोय अभिनेत्रीला त्रास

Coronavirus 3rd Wave | दिलासदायक ! देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नाही; तज्ञ म्हणाले…