Pune Corporation | महापालिकेतील भाजप पदाधिकार्‍यांची ‘एकाधिकारशाही’? कार्यकर्त्यांची हाती ‘घड्याळ’ बांधायला सुरूवात, नगरसेवक शेवटच्या टप्प्यात करणार ‘करेक्ट’ कार्यक्रम?

पुणे – विधानसभा (vidhan sabha) निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेली मंडळी टप्प्याटप्प्याने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’मध्ये (NCP) परतू लागली आहे. महापालिका निवडणुक (Pune Corporation Election) अद्याप दूर असली तरी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांच्या वाढदिवशी ‘जाहिरातींचा’ बार उडवत पून्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर ‘केंद्रातील’ एकाधिकार सत्तेप्रमाणेच महापालिकेतील (Pune Corporation) पदाधिकार्‍यांची ‘एकाधिकारशाही’ वाढल्यानेे भाजपच्या उपनगरातील नगरसेवकांमध्येही असंतोष पसरला असून ते आता उघड उघड बंडाची भाषा बोलू लागल्याने भाजपच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.

Cracked Smartphone Screens | आता आपोआप रिपेयर होईल Phone ची तुटलेली स्क्रीन, जाणून घ्या काय आहे शोध

देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बहुमताने सत्ता आल्यानंतर केंद्रातील सर्व सुत्रे ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) या दोनच व्यक्तींच्या हातात आली. पुर्वीच्या सत्ताधार्‍यांविरोधात असलेल्या नाराजीचा पुरेपूर फायदा घेत या दोघांनीही पक्षातही केवळ आपलाच ‘हुकूम’ चालणार याची परिपूर्ण तजवीज केली. यासाठी सर्व ज्येष्ठ मंडळींना कोपर्‍यात बसवून पक्षातील ‘होयबां’ची फौज राखली. लोकसभेनंतर सहाच महिन्यांत राज्यातही सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शहा (Amit Shah) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दोघेच राज्यातील प्रमुख म्हणुन पुढे आले. पक्षशिस्त आणि मोदींचा करिष्मा यामुळे या दोघांना तसा आतापर्यंत विरोध करण्याची धमक राज्यातील भाजपच्या एकाही नेत्याने आतापर्यंत दाखविली नाही.

Maval News | दुर्दैवी ! बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी धावला बाप, दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू

महापालिकेतही 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजपची बहुमताने सत्ता आली. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील मुक्ता टिळक (Mukta Tilak), मुरलीधर मोहोळ (muralidhar mohal), गणेश बिडकर (Ganesh Bidkar), धीरज घाटे (dheeraj ghate), श्रीनाथ भिमाले (shreenath bhimale) यांच्याच भोवती फक्त ‘पदांची’ भाकरी फिरली. यामुळे मूळ भाजपच नव्हे तर अन्य पक्षातून आलेले आणि भाजपकडून नगरसेवक झालेल्या नगरसेवकांमध्येही तीव्र असंतोष पसरला आहे. विशेष असे की 98 नगरसेवक निवडूण आले असताना निवडणुकीत पराभूत झालेले परंतू स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात आलेल्या गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना सभागृह नेतेपदी संधी दिल्याने अनेकांचा पापड मोडला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, मागील मार्चपासून कोरोनाची साथ सुरू झाल्याने महापालिकेचे आर्थीक गणित कोलमडले आहे. बरे तर पदाधिकारी मध्यवर्ती शहरात आहेत. विकास कामांना तशी संधीही कमी आहे. परंतू ते मोठ्याप्रमाणात निधी घेत आहेत. त्यातुलनेत कामाची संधी असलेल्या उपनगरांमधील नगरसेवकांना निधीची कमतरता भासत आहे. निधी मिळविण्यासाठी पदाधिकार्‍यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. यानंतरही सकारात्मक प्रतिसाद मिळेलच याची खात्री नाही. याउलट आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिकीट हवे असेल तर परिस्थिती असो अथवा नसो कार्यक्रम व जाहिरातबाजी करा असे जबरदस्तीचे खर्चिक कार्यक्रमही लादले जात आहेत. त्यामुळे इच्छा असो वा नसो पदाधिकारी सांगतील त्याच ‘फॉरमॅट’ मध्ये काम करावे लागत आहे, अशा तक्रारी उपनगरातील नगरसेवक खाजगीमध्ये करू लागले आहेत. पदाधिकार्‍यांच्या ‘एकाधिकारशाही’ मुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाताना पाच वर्षात रस्ते, गटार, पाणी याशिवाय कोणती ठोस कामे केली? हे कसे सांगायचे असा प्रश्‍न हे नगरसेवक उपस्थित करू लागले आहेत.

Nalasopara Crime | नालासोपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2.5 लाखांचे कंडोम जप्त; एक तृतीयपंथी अन् तिघींची सुटका

नगरसेवकांची ही अवस्था पाहून मोदींच्या लोकप्रियतेला भुललेले आणि वस्तुस्थिती लक्षात आलेले कार्यकर्ते आपल्या मुळ पक्षाकडे परतू लागले आहे. अगदी नगरसेवकांच्या घरातील काही मंडळींनीही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसांच्या जाहिरातींमधून दिसून आले. मागील दहा वर्षे महापालिकेत सत्ता राबविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडील ओघ प्रामुख्याने वाढला आगामी काळात ‘अजितदादांच्याच’ नेतृत्वाखाली आम्ही काम करु शकतो, असे भाजपचे अनेक नगरसेवक बोलू लागल्याने येत्या काळात भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपमध्ये हिरमोड झाल्याने चंद्रकांत टिंगरे स्वगृही !

विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले धानोरी- टिंगरेनगर (Dhanori-
Tingrenagar) येथील चंद्रकांत टिंगरे (Chandrakant Tingre) यांनी उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. टिंगरे यांच्या पत्नी रेखा टिंगरे
या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तीनवेळा उमेदवारी दिली असून
त्या तिनही वेळा निवडून आल्या आहेत. त्यांना सत्ता काळात महापालिकेतील महत्वाच्या पदांवर
संधीही देण्यात आली होती. परंतू भाजप लाटेत चंद्रकांत टिंगरे यांनी पक्ष बदलला.मात्र तांत्रिक
अडचण म्हणून रेखा टिंगरे या राष्ट्रवादीतच राहील्या. अवघ्या दोनच वर्षात भाजपकडून हिरमोड
झाल्याने चंद्रकांत टिंगरे हे परत स्वगृही परतून पक्षाच्या कामाला लागल्याची चर्चा वडगाव शेरी
मतदारसंघामध्ये सुरू आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corporation | Monopoly of BJP office bearers in PMC Workers start tying to join NCP corporator will do correct program in the last phase 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update