Pune Corporation | महापालिकेने रामटेकडी येथे ‘डंप’ केलेला कचरा ठेकेदाराकडून सोरतापवाडी येथे ‘रिडंप’?

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कोरोना काळामध्ये (Corona) रामटेकडी (Ramtekdi) येथे डंप केलेल्या सुमारे ८० हजार टन कचर्‍याची विल्हेवाट (Garbage Disposal) करण्यासाठी चार ठेकेदार नेमले. परंतू यापैकी एक ठेकेदार (Contractor) या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट सोरतापवाडी (Soratapwadi) येथे एका शेतात डंप करत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याची तक्रार स्थानीक नागरिक करू लागले आहेत. (Pune Corporation)

शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू होउन पावणेदोन वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यान त्यापुर्वी शहरातील प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अडचणी आल्याने महापालिकेने (Pune Corporation) रामटेकडी येथील बंद अवस्थेत असलेल्या दीशा कंपनीच्या शेडमध्ये कचरा साठवायला सुरूवात केली. नवीन प्रकल्प सुरू होईपर्यंत या ठिकाणी सुमारे ८० हजार टन संमिश्र कचरा साठला होता. या कचर्‍यावर जागेवरच प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चार स्वतंत्र कंपन्यांची नेमणूक करण्यात आली. परंतू या चारही कंपन्या विहीत मुदतीत काम पुर्ण करू शकल्या नाहीत. त्यापैकी एका कंपनीचे काम महापालिकेने थांबविले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या हद्दीबाहेरील उरूळी कांचन (Uruli Kanchan) जवळील सोरतापवाडी येथील खाजगी शेतामध्ये कचर्‍याचे ढीग दिसून येत आहेत. हा कचरा संमिश्र स्वरुपाचा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे कचर्‍याचा कमी वास येत असला तरी आग लागल्यास संपुर्ण भागात प्रदूषण होउ शकते. तसेच पावसाळ्यापुर्वी हा कचरा उचलला न गेल्यास अवकाळी पाउस अथवा पावसाळ्यात या कचर्‍याची दुर्गंधी सुटून परिसरातील जलस्त्रोतही खराब होण्याची भिती स्थानिक नागरिक व्यक्त करू लागले आहेत. रामटेकडी येथील कचरा प्लँन्ट (Waste plant) मधूनच हा कचरा येथे आणून टाकला जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

तर दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणार

सोरतापवाडी येथे खाजगी जागेवर टाकण्यात येत असलेल्या कचर्‍या बद्दल नागरीकांकडून तक्रारी आल्या आहेत.
या तक्रारींनुसार येत्या एक दोन दिवसांत खातरजमा करण्यात येईल. महापालिका शेतकर्‍यांना फक्त ओला कचरा देते.
तसेच ओल्या कचर्‍यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी दिले जाते.
मात्र, प्लॅस्टिक, रबर व अन्य विघटन न होणार्‍या कचरा आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल.
रामटेकडी येथे डंप केलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या चारपैकी एका ठेकेदाराचे काम थांबविण्यात आले आहे.
उर्वरीत तीन ठेकेदारांची बिलेही अद्याप दिलेली नाहीत.
पालिकेकडे आलेल्या तक्रारीवरून चारही ठेकेदारांना त्यांनी कचर्‍याची कोठे व कशी विल्हेवाट लावली याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणार्‍यांना ब्लॅकलिस्ट (Blacklist) करण्यात येईल.

– अजित देशमुख, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका.
(- Ajit Deshmukh, Deputy Commissioner, Solid Waste Department, Pune Municipal Corporation.)

रामटेकडी येथे डंप केलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराला प्रत्येक टनामागे ९०० रुपये टीपिंग फी देण्यात येते. विशेष असे की हा कचरा महापालिकेच्या वाहनांतून रामटेकडी येथे आणण्यात आला आहे. त्यावर प्रक्रिया न करताच केवळ तो कचरा उचलून अवघ्या १०ते १२ कि.मी. अंतरावर असलेल्या सोरतापवाडीपर्यंत नेउन ठेकेदार पालिकेची ‘लूट’ करत आहे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Web Title : Pune Corporation | Municipal Corporation ‘dumped’ at Ramtekdi by waste contractor and ‘re-dumped’ at Soratapwadi?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या