Pune Corporation | विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेचा ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पुणे महापालिकेच्या शाळांतील (PMC School) विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षण मंडळाने ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ ही विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण (PMC Teacher Training) देण्यात येत आहे. परंतु यानंतरही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास त्याची नोंद संबंधित शिक्षकाच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे. (Pune Corporation)

 

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ८० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु कोरोनाच्या मागील दोन वर्ष कोरोनामुळे शाळा अभावानेच सुरू राहिल्या आहेत. यामुळे अगोदरच शैक्षणिक सुविधांपासून दूर असलेल्या महापालिका शाळेतील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची आबाळ झाली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण मंडळाने ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. (Pune Corporation)

 

या मोहिमेमध्ये शिक्षकांनाच प्रथम प्रशिक्षित करण्यात येत आहे. पन्नास दिवसांच्या दीर्घ प्रशिक्षण कालावधीत ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. प्रत्येक शिक्षकाकडे ३० विद्यार्थी अशी जबाबदारी निश्चित करून त्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार अ, ब, क अशी श्रेणी करण्यात येणार आहे. क श्रेणीतील विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन ते विद्यार्थी ब श्रेणीत यावेत, ब मधील अ श्रेणीत यावेत यासाठी अधिक लक्ष द्यावे अशी या उपक्रमाची रचना आहे. गेल्या काही आठवड्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळाकडील अधिकार्‍यांनी दिली. (PMC Maza Vidyarthi Mazi Jababdari)

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हा मायक्रो उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांकडून नियमित अहवाल मागविण्यात येणार आहे.
तसेच अचानक पणे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
विद्यार्थी गुणवत्ता वाढीत शिक्षक कमी पडल्यास त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे.

मिनाक्षी राऊत, शिक्षण प्रमुख, पुणे महापालिका शिक्षण मंडळ
(- Meenakshi Raut, Head of Education, Pune Municipal Board of Education)

 

Web Title :- Pune Corporation | Municipal Corporation s Maza Vidyarthi Mazi Jababdari (My Student My Responsibility) initiative for enhancing student quality

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा