Pune Corporation | भुमिगत इंटरनेटर केबलवर महापालिका ‘मिळकत कर’ आकारणार; उत्पन्न वाढीसाठी ‘भिलाई’ पॅटर्न राबविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | शहरात उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सच्या मिळकत कराचा वाद न्यायालयामध्ये (Court Matter) असतानाच पुणे महापालिकेने (Pune Corporation) छत्तीसगड मधील ‘भिलाई’ महापालिकेप्रमाणेच (bhilai municipal, chhattisgarh) भुमिगत केबलवरही वार्षिक मिळकत कर आकारणीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (PMC standing committee) ठेवला आहे.

शहरात उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरसाठी महापालिकेकडून मिळकत कर आकारणी केली जाते. परंतू टॉवरच्या करांचे दर व थकबाकीवरून मोबाईल कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कोट्यवधींची थकबाकी अडकून पडली आहे. राज्यात सरकार कोणाचेही असले तरी मोबाईल कंपन्यांचे स्थानीक स्वराज्य संस्थांसोबत असलेल्या वादात तोडगा काढण्याच्या फारशा फंदात पडलेले नाही. अशातच महापालिका प्रशासनाने शहरातील भुमिगत केबल्सची निश्‍चित माहिती नसल्याने प्रत्येक रनिंग मिटरला 10 रुपये 30 पैसे बिगर निवासी वाजवी दर निश्‍चित करून भुमिगत केबलसाठी मिळकत कर आकारणी करण्याचे धोरण मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्य सभेची मान्यता घेण्यात येणार आहे.

सध्याच्या प्रचलित करांच्या दरानुसार आकारणी केल्यास 1 कि.मी. भुमिगत केबलसाठी अंदाजे 3 लाख 64 हजार 940 रुपये वार्षिक करपात्र रक्कम तयार होउन एका कि.मी.साठी वार्षिक 4 लाख 19 हजार रुपये मिळकत कराची मागणी करता येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pune municipal corporation commissioner vikram kumar) यांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शहरात कायदेशीर व बेकायदेशीररित्या भुमिगत केबल्स किती आहेत? याची माहिती प्रशासनाकडे नाही.

कायदेशीर व बेकायदेशीररित्या टाकलेल्या भुमिगत केबल्स शोधण्यासाठी नुकतेच महापालिकेने एजन्सी नेमली आहे.

इंटरनेट, ब्रॉडबँन्ड, मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांचे आर्थिक दायित्व वाढल्यास पुण्यातील या सेवांचे दर महागण्याची शक्यता. याचा भुर्दंड ग्राहकांना बसणार?

भुमिगत केबल्ससोबतच अन्य सेवा वाहीन्या अर्थात एम.एन.जी.एल., वीज वाहीन्यांनाही कर आकारणी केली जाणार? याबाबत संदीग्धता

Web Title :-  Pune Corporation | Municipal Corporation to levy ‘income tax’ on underground internet cable; Implement ‘Bhilai’ pattern to increase income

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sputnik Light | खुशखबर ! पुढील महिन्यात येतेय ‘सिंगल डोस स्पूतनिक लाईट’ व्हॅक्सीन, जाणून घ्या किती असेल किंमत

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,686 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Twitter India चे हेड मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत केली नवीन नियुक्ती