Pune Corporation | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेत कामाशिवाय प्रवेशबंदी ! लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही अनिवार्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी (PMC Officers and Employees) देखिल यातून सुटले नाहीत. महापालिकेच्या (Pune Corporation) मुख्य कार्यालयाच्या इमारतीतही (PMC Building) कोरोनाचा जोरदार शिरकाव झाल्याने महापालिका प्रशासनाने आजपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच व कामाचा तपशील घेउनच प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेक नागरिकांना आज प्रवेशद्वारावरूनच माघारी फिरावे लागले.

 

मागील दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दररोज तीन हजारांच्यावर संसर्ग झालेले रुग्ण आढळत असताना आज तर ही संख्या ४ हजार ८०० च्यावर गेली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने महापालिका भवनमधील अगंतुक प्रवेशावर मर्यादा आणल्या आहेत. प्रशासनाने आजपासून नवीन इमारतीमागील प्रवेशद्वार बंद केले असून फक्त जुन्या इमारतीच्याच प्रवेशद्वारातून नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. विशेषत: स्वत:च्या कामासाठी आलेल्या नागरिकांकडून कामाचा तपशील तसेच लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांनाही ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. (Pune Corporation)

प्रशासनाने घेतलेल्या या भुमिकेमुळे महापालिका भवनमध्ये दररोज येणार्‍या अगंतुक येणारे नागरिक व कार्यकर्त्यांना अटकाव बसला आहे.
तसेच प्रवेशद्वारावरच अधिकारी व कर्मचार्‍यांनाही लसीचे दोन डोस घेतल्याबाबत विचारणा केली जावू लागल्याने केवळ एकच डोस घेतलेले कर्मचारीही सजग झाले आहेत.
प्रशासनाने घेतलेल्या या भुमिकेमुळे आज दुपारनंतर महापालिका भवनमधील वर्दळ नेहमीपेक्षा कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

 

Web Title :-  Pune Corporation | No entry without work in Pune Municipal Corporation on the background of Corona Certificate of taking two doses of vaccine is also mandatory

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा