Pune Corporation | 100 नगरसेवक निवडूण आल्यानंतरही स्वीकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपदी संधी ! गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजप संविधानाची पायमल्ली करत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट (Video)

उच्च न्यायालयाने गणेश बिडकर यांचे सभागृह नेतेपद बेकायदा ठरविल्यावरून शहर कॉंग्रेसचा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | भाजपचे १०० नगरसेवक निवडूण (BJP Corporator) आले असतानाही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक झालेल्याला सत्तेच्या दबावाखाली भाजपने ‘सभागृह नेतेपदी’ (PMC House Leader) बेकायदेशीररित्या नियुक्त (Illegal Appointment) केले होते. त्यामुळे भाजप (BJP) गल्लीपासून दिल्लीपर्यंत संविधानाची (Constitution) पायमल्ली करत असल्याचे उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सभागृह नेतेपदावरून दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षात भ्रष्टाचार करून पुणेकरांची फसवणूक करणार्‍या भाजपने पुणेकरांची माफी मागावी, अशी मागणी आज कॉंग्रेसने (Pune Congress) केली आहे. (Pune Corporation)

 

कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe), प्रदेश पदाधिकारी मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi), अ‍ॅड. अभय छाजेड (Adv. Abhay Chhajed), नगरसेवक रविंद्र धंगेकर (Corporator Ravindra Dhangekar) यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेउन भाजपवर जोरदार हल्ला (Pune Congress Criticises BJP) चढविला. गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्या सभागृह नेते पदावरून उच्च न्यायालयात गेलेले नगरसेवक रविंद्र धंगेकर म्हणाले, भाजपचे १०० नगरसेवक जनतेतून निवडूण आले असताना पराभूत झालेल्या उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक करून सभागृह नेते पदी बसविण्यात आले. ही निवड बेकायदा असल्याबाबत महापौर (Pune Mayor) आणि महापालिका आयुक्तांकडेही (PMC Commissioner) तक्रार करण्यात आली होती. परंतू त्यांनी सत्तेच्या दबावाखाली त्यांनी कुठलाही निर्णय न घेतल्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने सभागृह नेते पद बेकायदा ठरवत रद्द केले आहे. त्यामुळे बिडकर यांच्या कालावधीत घेतलेले प्रस्ताव रद्द करावेत, तसेच सभागृह नेते म्हणून दिलेल्या सुविधा काढून घ्याव्यात व आतापर्यंत वापरलेल्या सुविधांची रक्कम वसुल करावी अशी आमची मागणी आहे. (Pune Corporation)

 

मोहन जोशी म्हणाले, भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत संविधानाची पायमली केली जात असल्याचे या घटनेवरून दिसून येते. भाजपने पुण्याची राजकिय संस्कृती धाब्यावर बसविली आहे. मागील पाच वर्षात भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजपने पुणेकरांची माफी मागावी. रमेश बागवे म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी. पाशवी बहुमताच्या जोरावर भाजपने कोरोनाच्या काळातही निविदा न काढताच बेकायदा कामे केली आहेत. हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निवेदन आयुक्तांना दिले आहे. याप्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे (Corporator Avinash Bagwe), माजी नगरसेवक विरेंद्र किराड (Former corporator Virendra Kirad) उपस्थित होते.

 

 

Web Title :- Pune Corporation | Opportunity for sanctioned Ganesh Bidkar as House Leader even after election of 100 corporators! From High Street to Delhi, BJP is trampling on the Constitution, clear from High Court verdict (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहराची ‘कोरोना’ मुक्तीकडे वाटचाल, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात