Pune Corporation | कोरोनाच्या नावाखाली वसुलीचे टार्गेट म्हणजे ‘तुघलकी’ कारभार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा प्रशासनावर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | कोरोना काळात सर्वच व्यावसायीकांचे उत्पन्न कमी झाले आहे. पथारी व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ असून गोरगरिबांच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाली असताना कोरोना नियमांच्या नावाखाली त्यांच्याकडून दररोज १० लाख वसुलीचे ‘टार्गेट’ देण्याचा तुघलकी कारभार महापालिकेने (Pune Corporation) बंद करावा. त्याऐवजी निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ होणार नाही, कामे न होताच बिले अदा केली नाही तर महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचतील, असा सल्ला विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (PMC Leader of Opposition Deepali Dhumal) यांनी प्रशासनाला दिला आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने (Disaster Management Department of Pune Corporation) कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दररोज १० लाख रुपये दंड वसुल करा असे फर्मान सर्वच क्षेत्रिय कार्यालयांना सोडले होते.
तीन दिवसांपुर्वी तसे आदेश दिल्यानंतर क्षेत्रिय कार्यालयेही उद्दीष्टपुर्तीसाठी रात्री उशिरापर्यंत या मोहिमेवर काम करत होती.
मात्र, उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या नादात सर्वसामान्य व्यापारी घटक, पथारी व्यावसायीकांची लुट होउ लागल्याने सर्वच स्तरातून महापालिकेच्या या निर्णयाचा विरोध होउ लागला.
अखेर आज दुपारी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या आदेशानंतर प्रशासनाने आदेशात नजरचुकीने १० लाख दंड वसुलीचा उल्लेख झाल्याची सारवासारव करत आदेश मागे घेतला.

 

या घटनेवरून विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पर्याय असताना कोरोनाकाळात पिचलेल्या जनतेकडून लूट करणे हा तुघलकी कारभार आहे.
गोरगरिबांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. व्यावसायीक मेटाकुटीला आले आहेत.
त्यांच्याकडून सक्तीने दंड वसुली करणे प्रशासनाला शोभणारे नाही.
नियमांची पायमल्ली होत असेल तेथे कारवाई करणे वेगळे आणि टार्गेट पुर्ण करण्यासाठी
कारवाई करणे वेगळा भाग आहे.
त्याऐवजी आकारणी न झालेल्या मिळकती शोधून कराचे उत्पन्न वाढवावे, निविदांमधील रिंग थांबवावी,
कामे न होताच बिले दिली जाणार नाही याची दक्षता घेतली तरी महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचतील. सत्ताधार्‍यांच्या तालावर नाचून असे प्रकार प्रशासन करत असेल त्याचा निषेधच करतो.
पुणेकर येत्या निवडणुकीत या तुघलकी कारभाराचा हिशेब चुकता करतील.

 

Web Title : Pune Corporation | Opposition leader Deepali Dhumal’s attack PMC administration

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | 31 टक्के DA झाल्यास सॅलरीत होईल जबरदस्त वाढ, जाणून घ्या गणित

RBI Alert | जुनी नाणी किंवा नोटांची विक्री करण्यापूर्वी व्हा सावध, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी पत्नीला माहेरी घेऊन गेलेल्या पतीचा प्रियकरानंच काढला काटा