Pune Corporation Order | पुणे महापालिकेचे आदेश ! बांधकामे व कुलींग टॉवर्ससाठी प्रक्रिया केलेले मैलापाणी वापरणे बंधनकारक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation Order | महाराष्ट्र जल नियामक मंडळाच्या (Maharashtra Water Regulatory Board) निर्देशानुसार शहरातील बांधकामांसाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (sewage treatment plant in pune) पाणी वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कुलिंग टॉवर्स (Cooling Towers) असलेल्या इमारतींमध्येही हेच पाणी वापरण्याची सक्ती केली गेली आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका प्रशासनाने (Pune Corporation Order) मंगळवारी काढले आहेत. पिण्याच्या पाण्याचा आणि भुगर्भातील पाण्याचा वापर यासाठी करता येणार नाही.

 

महाराष्ट्र जल नियामक मंडळाकडून पुणे महानगरपालिकेला (Pune Corporation) मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्यासंदर्भात सातत्याने निर्देश दिले जात होते. यासंदर्भातील परिपत्रक आजपासून लागू केले गेले असुन, शहरातील सर्व बांधकामे तसेच बॅच मिक्स प्लांट येथे संबंधित व्यावसायिकांना नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या अथवा खाजगी एसटीपी केंद्रातील (STP Center in Pune) प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

 

महानगरपालिकेच्या मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी व बॅच मिक्ससाठी आय एस ३०२५ व आय एस ४५६ या अभियांत्रिकी मानकानुसार योग्य आहे असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. खाजगी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वरील मानकानुसार बांधकामासाठी योग्य असल्याचे संबंधित व्यावसायिकाला तपासून घ्यावे लागणार आहे कोणत्याही परिस्थितीत बांधकामे व बांधकाम पूरक व्यवसायात पिण्याचे पाणी व भूगर्भातील पाण्याचा उपसा करून पाणी वापरावयाचे नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. शहरात असलेल्या अनेक मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कुलिंग टोवर्स वापरली जातात. त्यासाठी सुद्धा सर्व मॉल धारकांनी महानगरपालिकेच्या नजीकच्या मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणीच वापरायचे आहे. (Pune Corporation Order)

क्षेत्रीय कार्यालयांना पाहणीचे आदेश
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व बॅच मिक्स प्लांट येथे सर्व संबंधित व्यावसायिक व सर्व मॉल धारक नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या / खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरत आहेत की नाही याचा पाक्षिक अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठविण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले गेले आहे.

 

बांधकाम अभियंत्यांवरही जबाबदारी
बांधकाम विकास विभागातील अभियंत्यांनी त्यांच्या भागातील विकास कामांवर महानगरपालिकेच्या / खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात आहे का यासंदर्भातील पाक्षिक अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहे.

खासगी केंद्रांचा अहवाल चार महीन्यांनी तपासणार.

खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा बांधकामासाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे.
त्या संबंधित सोसायटीला प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने आय एस ३०२५ व आय एस ४५६
या अभियांत्रिकी मानकानुसार दर चार महिन्यांनी तपासून घेण्यास सांगून त्याचा
अहवाल मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती विभागाने सादर करावा लागणार आहे.

खासगी केंद्रांचे होणार सर्वेक्षण

खाजगी मिळकती मधील अकार्यक्षम मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे सर्वेक्षण करून ते
कार्यान्वित करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प विभागाने कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही या परीपत्रकात दिले आहेत.

 

 

Web Title :- Pune Corporation Order | Order of Pune Municipal Corporation! It is mandatory to use treated wastewater for construction and cooling towers sewage treatment plant in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

कायदेशीर आदेशाचा बागुलबुवा उभा करून PMPML संचालकांनी स्वत:चे अपयश झाकले; संचालक मंडळाचा ‘तो’ निर्णय संशयाच्या भोवर्‍यात

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1706 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune News | लेफ्टनंट आदित्य रमेश मचालेंच्या कर्तृत्वाची प्रेरणा आजच्या युवा पिढींनी घ्यावी – आबा बागुल