Pune Corporation | ई-कार भाडे तत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या चालकांचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंधनाची बचत (Fuel saving) आणि पर्यावरणाची (environment) हानी कमी करण्यासाठी ई-कारला (E-Car) प्रोत्साहन दिले जात आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी चालकासह ई-कार भाडे तत्त्वावर (rental basis) घण्याचा निर्णय घेतला आहे. ई-कार भाडे तत्त्वावर घण्याचा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee meeting) मांडण्यात आला होता.म15 दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ही कंपनी स्थापन केली असून, या कंपनीने ई कार भाडेतत्वावर पुरविण्यासाठी महापालिकेकडे विचारणा केली होती. त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. (Energy Efficiency Ltd.) कडून 38 टाटा नेक्सॉन ई कार (Nexon E car) चालकासह 8 वर्षे भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. 8 वर्षांनंतर या कार किंमतीच्या 5 टक्के रक्कम भरून पालिकेला स्वताःच्या मालकीच्या करून घेता येणार आहेत. यासाठी कार व चालकासह 23 कोटी 28 लाख 88 हजार रुपये खर्च येणार आहे. या गाड्या घेतल्यास महापालिकेचे महिन्याला 1 लाख 77 हजार रुपयांची बचत होणार आहे, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

सत्ताधारी भाजपकडून हा विषय मंजूर होणे अपेक्षीत होते,
परंतु महापालिकेत कायम सेवेत असलेल्या चालकांनी चालकांसह भाडेतत्वावर कार घेण्यास विरोध केला.
अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या गाड्यांवर गेल्या अनेक वर्षापासून कायम चालक काम करत आहेत.
ई कार आल्यावर या चालकांनी काय करायचे असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
त्यांनी याबाबत स्थायी समिती अध्यक्षांची भेट देखील घेऊन विरोध दर्शविला आहे.
महापालिकेने ई कार भाड्याने घ्याव्यात पण त्यातून चालक वगळावे अशी मागणी केली आहे.
या चालकांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मंजूर न होता पुढे ढकलण्यात आला आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी सांगितले,
चालकासह ई कार भाड्याने घेण्यास पालिकेच्या चालकांनी विरोध केला आहे.
तसेच ई कार भाड्याने घेण्यापेक्षा थेट खरेदी करता येईल का ?
त्यात महापालिकेच्या पैशाची बचत होऊ शकते का? याचा आढावा प्रशासनास घेण्यास सांगितले आहे.

Web Titel :- Pune Corporation | PCM drivers oppose proposal to hire e cars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | नगर अर्बन बँक शाखा व्यवस्थापकाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चा

Pune Corporation | पुणे पालिकेतील नगरसेवकांची ‘पोलखोल’, पालिकेच्या पैशांवर नगरसेवकांची सुरु असलेली ‘चमकोगिरी’ उजेडात

Pune Rural Police | गुंड गणेश रासकर खुन प्रकरणात फलटणच्या गौरव लकडेला अटक, मिरेवाडी शिवारातील ऊसात होता लपला