Pune Corporation | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करायला (PMC) सर्वसाधारण सभेची मान्यता

टी. पी. स्किममुळे रस्ते, उद्यान, मैदाने आदी नागरी सुविधांसाठी जागा तात्काळ विनामोबदला उपलब्ध होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) येथील सुमारे ६५० हेक्टर जागेवरील नियोजीत टीपी स्किमचा प्रारुप आराखडा (PMC Draft plan of TP scheme) हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) आज मान्यता दिली. यानिमित्ताने तब्बल ४० वर्षांनी पुणे महापालिकेने (Pune Corporation) पुन्हा एकदा टीपी स्किमनुसार नियोजीत विकासाला प्राधान्य दिले असून वरिल क्षेत्रात स्किम लागू झाल्यानंतर रस्ते, एस. टी. पी., कचरा रॅम्प, उद्याने या सारख्या नागरी सुविधांसाठी कुठल्याही मोबदल्याशिवाय जागा मिळणार असून तेथे राहणार्‍या नागरिकांनाही या सुविधा तात्काळ उपलब्ध होतील, असा दावा भाजपचे गटनेते गणेश बिडकर (BJP Group Leader Ganesh Bidkar) यांनी केला आहे.

 

पुणे महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट गावांमधून जाणार्‍या ११० मी. व सुधारीत ६५ मी. रुंदीच्या बाह्य वळण मार्गाच्या दुतर्फा टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ मध्ये यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. सुमारे ६५० हेक्टर क्षेत्रावर तीन टीपी स्किम (PMC TP scheme) राबविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता तसेच कोरोनामुळे प्रारुप आराखडा तयार करण्यास विलंब झाला आहे. हा प्रारुप आराखडा तयार झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन योग्य त्या दुरूस्त्या केल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे (Maharashtra Government) अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. (Pune Corporation)

पालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांच्या कालावधीत तीन टी. पी. स्कीमसाठी मे. डिझाईन पॉईंट कन्स्ल्टंट प्रा. लि. (Design Point Consultant Pvt. Ltd) यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली. नगर रचना कायद्यातील तरतुदींनुसार टी. पी. स्किम क्षेत्रातील मिळकतधारकांसोबत बैठका घेउन स्किमचे महत्व व त्यातून मिळणार्‍या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना येथील बाह्यवळण मार्गाची रुंदी ११० मी. वरून ६५ मी. पर्यंत कमी केली आहे. ही बाबही संबधित नागरिकांच्या निदर्शनास आणून देउन टी. पी. स्किमचा दुरूस्त आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. यापैकी फुरसुंगी येथील टी. पी. एस. १० चा आराखडा नव्याने करण्यात येणार आहे.

या स्किममध्ये उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांचा भुखंड असून त्यामध्ये लिटीगेशन असल्याने तो वगळण्यात येणार आहे. यानंतर नगर नियोजन विभागाच्या मान्यतेनंतर या स्किमच्या आराखड्यावरही हरकती व सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती, शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) यांनी दिली.

 

दरम्यान, सर्व साधारण सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी बारामती मतदारसंघामध्ये होत असलेल्या या टी. पी. स्किममुळे स्थानीक नागरिकांना पाणी, रस्ते व अन्य आवश्यक सुविधा विनाविलंब मिळण्यास मदत होणार आहे.
मागील २५ ते ३० वर्षांपासून कचरा डेपोमुळे येथील नागरिकांनी त्रास सहन केला आहे.
परंतू टी. पी. स्किममुळे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी देखिल या स्किमचे प्रेझेंटेशन सर्व नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावे.
टी. पी. स्किम झाल्यानंतर महापालिकेने पुन्हा तेथे विकास आराखडा करू नये.
येथील नागरिकांकडून पुन्हा जागा घेणे अन्यायकारक होईल.
त्यामुळे आराखडाच पुढील १०० वर्षांचा विचार करून तयार करावा.
शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी देखिल टी. पी. स्किमचे स्वागत केले असून हरकती व सूचनांनंतर तो शासन स्तरावर मंजुर करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे पाठपुरावा करू.

 

या आहेत टी. पी. स्किम

१. टी. पी. एस. ६ – उरूळी देवाची – १०९.७८ हेक्टर

२. टी. पी. एस. ९ – फुरसुंगी – २६०.६७ हेक्टर

३. टी. पी. एस. १० – फुरसुंगी – २७९.७१ हेक्टर

 

Web Title :- Pune Corporation | PMC General Body meeting approves to publish draft plan of TP scheme at Uruli Devachi and Fursungi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा