Pune Corporation | जंबो हॉस्पीटलची उभारणी PMRDA कडून पण निवडणुकीच्या तोंडावर ‘महापालिका भवन’ बनले राजकिय आखाडा; पुणेकरांची होतेय कोंडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | जंबो कोव्हीड सेंटरमधील (PMC Jumbo Hospital) कथित भ्रष्टाचाराची तक्रार (Corruption Complaint) देण्यासाठी ‘सुट्टीच्या’ दिवशी महापालिका भवन (Mahapalika Bhavan) येथे आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), त्यांना शिवसैनिकांनी (Shivsainik) केलेली धक्काबुक्की आणि आता भाजपकडून महापालिका भवनच्या पायर्‍यांवर सोमय्या यांचा सत्कार हा संपुर्ण ‘राजकिय स्टंट’ आहे. आगामी निवडणुकीच्या (PMC Elections) तोंडावर ‘महापालिका भवन’चा राजकिय आखाडा करण्यात आला असून सर्व यंत्रणा वेठीस धरण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. (Pune Corporation)

 

मार्च २०२० मध्ये पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत संसर्गान अक्षरश: थैमान घातले. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावरील उपायांबाबत जगातील आरोग्य यंत्रणा दिशाहीन असताना रुग्णसंख्या आणि बळींची संख्या भयावह वाढत गेली. मोठ्याप्रमाणात नागरीकरण झालेल्या पुण्यात मुंबईपाठोपाठ सर्वाधीक रुग्ण आढळल्याने देशपातळीवर पुणे रेड झोनमध्ये राहीले. रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडस्, ऑक्सीजन आणि डॉक्टर व मेडीकल रिपोर्ट स्टाफची कमतरता मोठ्याप्रमाणावर जाणवत असताना अक्षरश; उपचाराअभावी अनेकांनी रस्त्यावर, ऍम्ब्युलन्समध्येच प्राण सोडले. (Pune Corporation)

 

या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुढाकार घेउन पुणे व पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) मध्ये तात्पुरते जंबो हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जंबो हॉस्पीटलसाठी अगदी उभारणीपासून ते संचलनापर्यंतची निविदा प्रक्रिया राबविणे व पाठपुरावा करण्याची जबाबदारी पीएमआरडीए कडे होती. पुणे महापालिकेने समन्वयासाठी मनुष्यबळाचे सहकार्य केले. तसेच औषध पुरवठ्याची जबाबदारी पार पाडली. राज्य शासन आणि महापालिकेकडेही डॉक्टर्स व मेडीकल स्टाफची कमतरता असल्याने पीएमआरडीएनेच लाईफलाईन या संस्थेला काम दिले. ऑगस्टमध्ये जंबो हॉस्पीटल सुरू करण्यात आले. जेमतेम आठवडाभर या संस्थेने काम केल्यानंतर त्यांची कार्यपद्धती तितकीशी समाधानकारक नसल्याचे समोर आल्याने तातडीने त्यांचे काम काढून घेत मेडब्रो या संस्थेकडे काम देण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लाईफलाईन या संस्थेकडे जंबो हॉस्पीटलचे काम देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. यानंतर ते महापालिका भवन येथे आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आले. विशेष असे की शनिवारी महापालिकेला सुट्टी असतानाही ते महापालिकेत आले होते. त्यांच्या या दौर्‍याची त्यांनी प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे सोमय्या हे महापालिकेत येणार असल्याची अगोदरच माहिती असलेले शिवसैनिक मोठ्यासंख्येने महापालिकेत आले होते. विशेष असे की महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा एखाद दुसरा पदाधिकारी वगळता सोमय्या यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांसोबत कोणीच नव्हते.

यावेळी शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळात सोमय्या महापालिका भवनच्या पायर्‍यांवर कोसळले.
किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसर्‍या दिवशी रविवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला.
रविवारी महापालिकेला सुट्टी असतानाही पुन्हा सोमय्या महापालिकेत आले आणि गेटवरच सुरक्षा रक्षकाकडे तक्रारीचे निवेदन देउन गेले.
यानंतर गेली आठवडाभर सोमय्या व भाजपच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याची अगदी गल्लीपासून दिल्लीपासून जोरदार प्रसिद्धी केली.
एवढेच नव्हे तर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी ११ फेब्रुवारीला महापालिका भवनच्या पायर्‍यांवर जिथे सोमय्या कोसळले तेथेच त्यांच्या सत्काराची घोषणा केली.

मुळातच जंबो हॉस्पीटलमध्ये लाईफलाईन संस्थेची नेमणूक पीएमआरडीएने केली
असताना किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यामागील हेतुबाबतच संशय निर्माण होत आहे.
मागील दोन वर्षे एकत्रितपणे कोरोनाशी लढा देउन पुणे शहर पुर्वपदावर आणण्यासाठी झटणारे पालिकेतील सर्व पदाधिकारी व नगरसेवक,
प्रशासन आणि स्वंयसेवी संस्था यापैकी एकजण देखिल सोमय्या यांच्यासोबत नसणे,
खुद्द भाजपच्या स्थानीक पदाधिकार्‍यांनीही लाईफलाईन अथवा मेडब्रो संस्था व अन्य खर्चांबाबत एकही आरोप न करणे
हे मुद्दे मात्र या चर्चेतून बाजूला पडले आहेत. परंतू मागील शनिवारी महापालिका भवनच्या आवारात झालेल्या गोंधळामुळे प्रशासन बॅकफुटला गेले आहे.
प्रशासनाने पालिकेतील प्रवेशावर मर्यादा आणल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही वेठीस धरण्यात येउ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Web Title :- Pune Corporation | PMC Jumbo Hospital was set up by PMRDA but in the run up to elections, ‘Mahapalika Bhavan’ became a political arena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | पुणे मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, पण…

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात