Pune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. मात्र हाच खर्च करण्यासाठी उत्पन्न मिळवून देणाऱ्या पुणे मनपाच्या (Pune Corporation) विभागांकडे प्रशासन आणि ‘विकासाचे’ स्वप्न दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः ज्या ‘मिळकत करा’ च्या उत्पन्नावर स्वप्नांचे इमले बांधले जात आहेत, त्या विभागात तब्बल 100 कर्मचारी कमी आहेत व जे कर्मचारी आहेत त्यांना पुरेशा सुविधा देखील नाहीत.

मिळकतकर विभागाकडे (PMC Property Tax Department) महापालिकेचा (Pune Corporation) प्रमुख उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिले जाते. पहिल्या चार माहीन्यातच या विभागाने एक हजार कोटी रुपये उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. तसेच थकबाकी व नवीन आकारणी साठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

नव्याने आलेल्या 23 गावांमुळे पालिकेची हद्द 516 चौ. की. मि. झाली आहे. तर आकारणी खलील मिळकतीची संख्या 12 लाखांपुढे गेली आहे. असे असताना मिळकत कर विभागात जेमतेम 349 अधिकारी, कर्मचाऱ्यांची मान्यता आहे. प्रत्यक्षात मात्र यापैकी 100 पदे रिक्त आहेत. थोडक्यात एक तृतीयांश पदे रिक्त आहेत. प्रशासनाने मिळकत कर वसुलीसाठी अन्य विभागातील 40 ते 45 कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात या विभागाला दिले आहेत.

तात्पुरत्या स्वरूपात अन्य विभागातील कर्मचारी दिल्याने अन्य विभागातील कामकाजावर परिणाम होत आहे.
मिळकत कर विभागातील सर्व कार्यालयांमध्ये फायलींचे ढीग रचलेले आहेत.
मात्र, कर्मचाऱ्यांना बसायला धड जागा नाही. कर्मचारी दाटीवाटीने बसल्याचे पाहायला मिळते.
कर्मचाऱ्यांचे बहुतांश काम संगणकावर आहे.
परंतु संगणकाची संख्या देखील जेमतेम 100 असल्याने एकाचे काम झाले की दुसऱ्याला संगणक उपलब्ध होतो.
अशा परिस्थितही या विभागातील कर्मचारी त्यांचा परफॉर्मन्स देत आहेत.
मात्र याकडे प्रशासन आणि सत्ताधारी देखील दुर्लक्ष करत असून अपेक्षांचे ओझे लादत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये ‘खदखद’ सुरू आहे.

Web Titel :- Pune Corporation | PMC property tax department news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST Driver Suicide | धक्कादायक ! एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ ! पुण्यात पोलीस हवालदाराची पकडली ‘कॉलर’

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या