Pune Corporation | ‘पोलीसनामा’ इम्पॅक्ट ! ‘सर्वपक्षीयांनी’ स्मार्ट सिटीचे 58 कोटी रुपयांचे दायित्व महापालिकेवर लादले; राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेसला पुन्हा एकदा ‘पश्‍चाताप’

कॉंग्रेस किरीट सोमय्यांच्या मदतीने ‘ईडी’कडे तक्रार करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | स्मार्ट सिटीच्या बहुचर्चित ‘एटीएमएस’ अर्थात ऍडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या देखभाल दुरूस्तीच्या ५८ कोटी रुपयांच्या दायित्वाचा बोजा महापालिकेवर (Pune Corporation ) टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेसला (Congress) ‘पुन्हा एकदा’ ‘पश्‍चाताप’ झाला आहे. या दोन्ही पक्षांनी कालच स्थायी समितीमध्ये (pmc standing committee) मंजुर केलेल्या यासंदर्भातील प्रस्तावाचा फेरविचार दिला आहे. दरम्यान, विविध त्रुटींमुळे अडगळीला पडलेला हा प्रस्ताव एका दिवसांत ऐनवेळी स्थायी समितीमध्ये आणून मान्य करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून सत्ताधारी पक्षाच्या ‘माजी सभागृहनेत्याने’ विशेष प्रयत्न केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

 

पुणे शहरातील वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी कंपनीने (Pune Smart City Company) एटीएमएस सिस्टिम बसविण्यासाठी २०१८ मध्ये निविदा काढल्या होत्या.
पहिल्या टप्प्यात शहरातील २६१ चौकांपैकी १२५ चौकांमधील सिग्नल एकमेकांशी जोडून अधुनिक यंत्रणेने नियंत्रीत करणे.
गर्दीनुसार सिग्नलचे टायमिंग सेट करणे, यामुळे प्रवासाची वेळ कमी करून गती वाढविणे हा ही यंत्रणा बसविण्यामागील प्रमुख उद्देश आहे. परंतू २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या या निविदांना सुरवातीच्या काळात काहीसा विरोध झाला होता.
गल्लीबोळांचे अरुंद रस्ते आणि वाहनसंख्या अधिक असलेल्या शहरात ठराविक चौकांमध्ये ही यंत्रणा राबविण्यावरून मतभेदही झाले होते.

 

दरम्यान २०१९ मध्ये राज्यातील सरकार बदलले. स्मार्ट सिटी कंपनीच्या मागील महिन्यांत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय (Pune Corporation)
संचालकांनी ‘गुपचूप’ निविदा मंजूर केली. सुमारे १०२ कोटी ६२ लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या मे. विंदिया टेलिलिंक्स प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले.
पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल दुरूस्ती करणे यासाठी प्रतिवर्षी ११ कोटी ५८ लाख असा एकूण ५७ कोटी ९४ लाख रुपये खर्चही येणार आहे.
स्मार्ट सिटीकडे पैसे नसल्याने हा खर्च महापालिकेने करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने (Pune Corporation) मान्य केला.

महापालिकेवर लादलेल्या सुमारे ५८ कोटी रुपयांच्या दायित्वाबद्दल ‘पोलीसनामा’ ने आवाज उठविल्यावर या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये पाठींबा देणारे विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आज जागे झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सत्ताधार्‍यांनी गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
तसेच या प्रस्तावाचा फेरविचारही देण्यात येणार असून यापुर्वी चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेेले ५ प्रस्ताव व हा प्रस्ताव विखंडीत करावा.
अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या स्थायी समितीतील सदस्यांनाही ‘अभ्यास’ पुर्वक निर्णय का घेत नाही याबाबतही जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (Congress Group Leader Aba Bagul) यांनी या प्रस्तावाचा फेरविचार दिला आहे.
तसेच कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे (corporator arvind shinde) यांनी त्यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र फेरविचार दिला आहे.
यावरून महापालिकेतील (Pune Corporation) कॉंग्रेसमध्ये ‘समन्वय’ नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये २०१८ मध्ये या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने यासंदर्भात आलेली निविदा वादग्रस्त ठरली होती.
ती बाजूला ठेवण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात तर निविदेची फाईलच गहाळ झाल्याचे प्रशासनाने सांगितले होते.
मात्र, अचानक काल एका दिवसांत फाईल मंजुरीसाठी आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्या सांगण्यावरून सत्ताधारी पक्षाच्या माजी सभागृहनेत्यानेच प्रशासनावर दबाव टाकून हा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला.
याप्रकरणी हे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकार्‍यांचे सीडीआर तपासावेत, अशी आमची मागणी आहे.
शंभर कोटी रुपयांच्यावर गैरव्यवहार असल्याने आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. ही तक्रार करण्यात मदत करावी असे विनंतीपत्रही भाजपच…

 

Web Title : Pune Corporation | ‘Policenama’ Impact! ‘All Parties’ imposed Rs 58 crore liability of Smart City on NMC; Nationalist Congress Party once again ‘repents’ to Congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

Pune Crime | शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला ‘असा’ बदला, पुण्यातील खळबळजनक घटना