Pune Corporation | महापालिका आयुक्तांनी खरेदीला लावलेला ‘ब्रेक’ नगरसेवकांनी केला ‘सैल’ ! बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या खरेदीला मंजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | बेंचेस व कचऱ्याच्या बकेट मधील कथित घोटाळ्यानंतर या वस्तूंच्या खरेदीला महापालिका आयुक्तांनी लावलेला ‘ब्रेक’ नगरसेवकांनी पुन्हा ‘सैल’ केला आहे. आज सर्वसाधारण सभेमध्ये (PMC GB Meeting) वॉर्ड स्तरीय निधीतून बेंचेस, कापडी पिशव्या आणि बकेट खरेदी प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत खरेदी करण्यास मान्यता (Pune Corporation) दिली आहे.

 

मागील काही वर्षात नगरसेवकांनी कचऱ्याच्या बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या आणि कचऱ्याच्या ढकल गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. परंतु या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे.

 

दरम्यान कोरोनामुळे मागीलवर्षी महापालिकेचे उत्पन्न घटले. यामुळे शासन आदेशानुसार महापालिकेने (Pune Corporation) खर्चावर मोठ्याप्रमाणावर निर्बंध आणले आहेत. आयुक्तांनी पालिकेची विकासकामे व खरेदीची प्राथमिकता आणि निर्णय घेण्यासाठी वित्तीय समिती स्थापन केली. या समितीने उत्पन्न व खर्चाचा मेळ घालत अनावश्यक कामे व खरेदीला लगाम लावला. एवढेच नाही तर मागील दोन आर्थिक वर्षात ही खरेदी जवळपास बंद करण्यात आली आहे.

 

मात्र आज सर्वसाधारण सभेत स्थायी समितीने (pmc standing committee) 2018 मध्ये मंजूर केलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर केला.
या प्रस्तावानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वॉर्ड स्तरीय निधी व
अन्य वर्गीकरणातून एकाच प्रभागात 5 लाख रुपयांपर्यंत बेंचेस, 5 लाख रुपयांपर्यंत बकेट किंवा
पिशव्या किंवा ढकलगाडी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विशेष असे की 2 वर्षांपूर्वी चा हा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी मंजूर करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Commissioner’s ‘break’ for purchase was done by corporators ‘loose’! Approval for purchase of buckets, benches, cloth bags

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा