Pune Corporation | पुणे मनपाचे प्रशासक विक्रम कुमार यांचा दणका ! शहरात अतिक्रमण कारवाईला सुरुवात

हडपसर परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | नगरसेवकांचा (Corporator) कार्यकाळ 14 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी प्रशासकपदाची (PMC Administrator) सुत्रे हाती घेतली. प्रशासक पदाची सुत्रे हाती घेताच विक्रम कुमार यांनी शहरातील (Pune City) पदपथ आणि मोकळ्या जागेवर बेकायदेशीर व्यवसाय (Illegal Business) करुन विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या व्यवसायिकांना तातडीने अतिक्रमण (Encroachment) काढण्याचे आदेश दिले होते. तसेच अतिक्रमण न काढणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा विक्रम कुमार यांनी दिला होता. त्यानंतर आज हडपसर (Hadapsar) परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune Corporation)

 

प्रशासकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर आजपासून कारवाई सुरू केली. हडपसर येथे कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमण विरोधी पथक (Anti-Encroachment Squad) आणि बांधकाम विभागाच्या (Construction Department) वतीने ही कारवाई सुरू आहे.

महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासकपदाचा कार्यभार स्विकारताच शहरातील रस्ते मोकळे करण्यास प्राधान्य दिले आहे.
पदपथ, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या साईड, फ्रंट मार्जीनमध्ये सुरु असलेले पथारी व्यवसाय, हॉटेल्स व अन्य व्यवसाय तातडीने बंद करावेत. तसेच यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्ट्रक्चर संबंधित व्यावसायीकांनी काढून घेण्याचे आदेश दिले होते.
यानंतरही बेकायदा व्यावसायीक आढळून आल्याने त्यांच्यावर आज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या फ्लेक्स (Flex), बॅनर (Banner), झेंडे (Flags) लावण्यात आले आहेत.
हे सर्व फ्लेक्स, बॅनर व झेंडे काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation Administrator & PMC Commissioner Vikram Kumar Encroachment action begins in Hadapsar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा