Pune Corporation | पुणे महापालिका ‘अलर्ट’ ! कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; बेडस्, औषधे आणि ऑक्सीजनची सुसज्जता

पुणे –  पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना (corona patients increase in pune) महापालिका अलर्ट (Pune Corporation) झाली आहे. तूर्तास गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असले तरी पुर्वानुभव लक्षात घेता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये (PMC Hospitals) दोन हजार बेडस् तयार ठेवण्यात आले असून ऑक्सीजन व औषधांचीही तयारी ठेवली आहे. कोव्हिशिल्ड (covishield) आणि कोव्हॅक्सीन (covaxin) लसींसोबतच सिरिंजचाही पुरेसा साठा असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकाअधिक लसीकरण करण्यासाठी 40 केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (pmc additional commissioner ravindra binwade) यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी अधिकारी स्तरावर कोरोनाचा आढावा घेतला. बैठकीनंतर बिनवडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की महापालिकेची बाणेर (Baner) येथील दोन कोव्हीड स्पेशल हॉस्पीटल (covid special hospital pune), लायगुडे हॉस्पीटल (laigude hospital pune), नायडू हॉस्पीटलमध्ये (naidu hospital pune) सध्या कोव्हीड रुग्णांवरील उपचारासाठी सुसज्ज आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. परंतू उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या वाढल्यास औषधांची व उपचार सुविधांची पुर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सध्या पालिकेकडे साडेचार हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा स्टॉक आहे. तसेच टॉसीलिझुमॅब व अन्य औषधांच्या खरेदीलाही मान्यता घेउन वर्क ऑर्डर तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. कमला नेहरू हॉस्पीटल, नायडू हॉस्पीटल, लायगुडे हॉस्पीटल व अन्य एका रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटस्ची कामेही सुरू आहेत. ती देखिल लवकरच पुर्ण होतील. (pune corporation)

लसीकरणाला वेग देणार

ओमीक्रॉनच्या (omicron covid variant) पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच इम्युनिटी वाढविण्यासाठी (immunity booster) 60 वर्षावरील नागरिक आणि फ्रंट लाईन हेल्थ वर्कर्सना (frontline health worker) बूस्टर डोस (booster dose) देण्यास मान्यता दिली आहे. 1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करण्यास सुरूवात केली जाणार आहे. तर 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना सुरवातीला 5 केंद्रांवर लस दिली जाणार असली तरी आठवड्याभरात या केंद्रांची संख्या 40 पर्यंत वाढविण्यात येईल.

– रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation ‘Alert’! Rapid increase in corona morbidity; Equip beds, medicines and oxygen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान