Pune Corporation | पुणे पालिकेतील नगरसेवकांची ‘पोलखोल’, पालिकेच्या पैशांवर नगरसेवकांची सुरु असलेली ‘चमकोगिरी’ उजेडात

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे महानगरपालिका (Pune Corporation) हद्दीमध्ये नव्याने गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. समाविष्ट गावांना टँकरने मोफोत पाणी पुरवठा (Free water supply) करणारे होर्डिंग नगरसेवकांनी लावली आहेत. मात्र या नगरसेवकांची चांगलीच पोलखोल झाली आहे. एकीकडे स्वत:च्या नावाने मोफत पाणी पुरवठा करण्याचा संकल्प करणारे होर्डिंग लावायचे. तर दुसरीकडे वर्गीकरणातून या पाणी पुरवठ्यासाठी 90 लाख रुपये मिळावेत यासाठी ऐनवेळी प्रस्ताव स्थायी समितिला (Standing Committee) सादर करायचे. यावरुन नगरसेवकांची (Corporator) महापालिकेच्या (Pune Corporation) पैशांवर स्वत:ची चाललेली चमकोगिरी उजेडात आली आहे.

ऐनवेळी 90 लाखाचे 4 प्रस्ताव

महापालिकेची स्थायी समितीची बैठक मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत बालेवाडीच्या (Balewadi) नगरसेवकांनी आपल्या प्रभागाती काही निधी हायवे येथील सुशोभिकरणासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी दिला होता. हा विषय सभेच्या कार्यपत्रिकेवरही आला होता. परंतु, हे विषय मागे घेऊन ऐनवेळी आलेले चार प्रस्ताव (Proposal) बैठकीत दाखल करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 9 क मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सुस (Sus) व महाळुंगे (Mahalunge) या गावांना टँकरने पाणी पुरवठा (Water supply by tanker) करण्यासाठी निधीचे वर्गिकरण करण्याचा विषय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. या बैठकीत 20 लाखांचे तीन तर 30 लाखांचा एक असे एकूण 90 लाखांचे चार प्रस्ताव मान्यतेसाठी देण्यात आले होते.

प्रस्तावाला मान्यता देण्याचे टाळले

स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी आलेले वर्गीकरणाच्या मान्यतेचे प्रस्ताव स्थायी समितीने एक महिन्यासाठी पुढे ढकलले.
या प्रस्तावांना लगेच मान्यता देण्याचे स्थायी समितीने टाळले.
मात्र आगामी महापालिका निवडणुका (Pune Corporation elections) डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांची महापालिकेच्या पैशांवर सुरु असलेली चमकोगिरी उजेडात आली.
त्यामुळे पालिकेच्या पैशांवर अशापद्धतीने चमकोगिरीची किती प्रकरणे उजेडात येणार हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गावांना पाणी देण्याची जबाबदारी पालिकेची

स्थायी समिती अध्यक्ष हेमेंत रासने (pmc standing committee chairman hemant rasane) यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक 9 क मधील सूस-महाळुंगे या गावांचा पालिकेत नव्याने समावेश झाला आहे. या गावांना पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी पालिकेची आहे.
ती जबाबदारी पालिका पूर्ण करेल. मात्र, आज आलेले वर्गीकरणाचे विषय मान्य करण्यात आलेले नाहीत.
ते एक महिना पुढील स्थायी समितीच्या बैठकीत कार्यपत्रिकेवर घेतले आहेत.

सुस आणि म्हाळुंगे गावे नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांना सध्या मी स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा करत आहे. पुढील काळात महापालिकेने या गावांना पाणी पुरवठा करावा यासाठी स यादीतून वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेचा पाणी पुरवठा सुरू होईल. यामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा कुठलाही उद्देश नाही . उलट नागिरकाना सुविधा मिळणार आहे.

– अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेवक

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation corporators news regarding money of pmc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Basavaraj S Bommai | बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

Pune Rural Police | गुंड गणेश रासकर खुन प्रकरणात फलटणच्या गौरव लकडेला अटक, मिरेवाडी शिवारातील ऊसात होता लपला

Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या