Pune Corporation | पुणे मनपाकडून ‘अनलॉक’चे सुधारित आदेश जारी; रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान संचारबंदी लागू, जाणून घ्या इतर आस्थापनांच्या वेळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | गेल्या 3 महिन्यांपासुन पुणे शहरात कोरोना निर्बंध लागू होते. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याने आणि पॉझिटिव्हीटी दर कमी होत असल्यानं पुण्यातील निर्बंध (Lockdown) शिथिल करण्यात यावे अशी मागणी पुणेकरांकडून तसेच पुणे व्यापारी महासंघाकडून वेळावेळी करण्यात येत होती. अखेर आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाला. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनी ट्विट करून सांगितले. आता पुणे महानगरपालिका (Pune Corporation) प्रशासनाकडून पुणे अनलॉकचे सुधारित आदेश (PMC modified order) निर्गमित करण्यात आले आहेत.

उद्यपासून (सोमवार) लागू होणारे सुधारित आदेश पुढील प्रमाणे आहेत. (PMC Modified Order)

1. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस (दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मॉल्स आठवडयातील सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र मॉलमध्ये काम करणारे अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण (दोन डोस) व दर 15 दिवसांनी कोविड तपासणी करणे बंधनकारक राहील. तसेच लसीकरणाचे दोन डोस झालेल्या ग्राहकांनाच मॉलमध्ये प्रवेश राहील. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील.

3. रेस्टॉरंट, बार, फुड कोटृ हे आठवडयातील सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. पार्सल सेवा / घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

4. पुणे मनपा क्षेत्रातील उद्याने सर्व दिवस सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहतील.

5. क्रीडा – जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ वगळून इतर सर्व खेळ नियमितपणे सुरू राहतील.

6. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पुर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.

7. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस (कोचिंग क्लासेस) हे सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींचे लसीकरण (किमान एक डोस) अनिवार्य आहे.

8. व्यायामशाळा (जीम), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (बाय अपॉईंटमेंट) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.

9. पुणे मनपा क्षेत्रात रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी तसेच रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत (अत्यावश्यक कारण वगळता) संचारबंदी राहील.

10. या आदेशातील नमूद बाबीं व्यतिरिक्त इतर बाबींसाठी दि. 26 जून 2021 रोजी निर्गमित आदेश लागू राहील.

11. सदर आदेश हे पुणे मनपा क्षेत्रामध्ये येणार्‍या पुणे कॅन्टोमेंट आणि खडकी कॅन्टोमेंट यांना देखील लागू राहील.

12. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation issues amended order for ‘Unlock’; Curfew imposed between 11 pm and 5 am, find out the times of other establishments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, 233 रुग्णांना डिस्चार्ज

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Olympics 2020 | टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या त्यांच्या बाबत