Pune Corporation | पुणे महापालिकेकडून अंथरुणाला खिळून असलेल्यांचे लसीकरणाचे नियोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पुणे शहरामध्ये कोरोना विरोधातील लसीकरण (Vaccination) मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. पुणे शहरातील जे नागरिक अंथरुणाला खिळून आहेत, अशा नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner of Pune Municipal Corporation Ravindra Binwade) यांनी दिली.

पुणे महापालिकेती आरोग्य विभागाची (Health Department) बैठक बिनवडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी लसीकरणावर भर देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाशिवाय कोमॉर्बिड, अपंग यांच्यासह रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘वॅक्सीन ऑन व्हिल्स’ Vaccine on wheels या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करुन त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्या, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

घरी जाऊन लसीकरण करणे अशक्य

पुण्यात प्रत्येक रुग्णाच्या लसीकरण करणे अत्यंत अवघड आहे. कारण लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही त्रास होतो का हे पाहण्यासाठी अर्धातास वाट पहावी लागते. त्यामुळे कर्मचाऱ्याने एखाद्या व्यक्तीला लस दिली तर कर्मचाऱ्याला त्या व्यक्तीच्या घरी अर्धातास थांबावे लागणार आहे. त्यामुळे रुग्णाच्या घरी जाऊन लसीकरण करणे अशक्य आहे. जर रुग्णाच्या घरी जाऊन लसीकरण सुरु केले तर दिवसाला किती नागरिकांचे लसीकरण होणार, हे पाहावे लागणार आहे.

ईमेलद्वारे रुग्णांची माहिती घेणार

यासंदर्भात बोलताना बिनवडे यांनी सांगितले की, यासाठी एक नवा ईमेल आयडी (Email ID) उघडून रुग्णांची माहिती गोळा केली जाईल.
यामध्ये डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय, रुग्णाचे कन्सेन्टही घेतले जातील.
याशिवाय माहिती गोळा झाल्यानंतर कोणत्या विभागात किती रुग्ण आहेत याची माहिती एकत्रित केली जाईल.
त्यानंतर लसीकरणाचे नियोजन (Vaccination planning) केले जाईल.

स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

एका व्हायलमध्ये लसीचे दहा डोस असतात. मात्र, या परिस्थितीत लस वाया जाण्यापेक्षा अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण करणे हे महत्त्वाचे समजले जाईल.
यासाठी स्वयंसेवी संस्थांची (NGOs) मदत घेतली जाईल.
नर्स, डॉक्टर्स असोसिएशन यांच्याकडून अशा रुग्णांची माहिती घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे, असेही बिनवडे यांनी सांगितले.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation plans to vaccinate those who are bedridden

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Officer । ‘संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय’, स्वेच्छानिवृत्तीसाठी महिला IPS अधिकाऱ्याचे DGP ला पत्र

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी