Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | कार्यकाळ संपायला अवघे काही दिवस राहीले असून निवडणुकांचे घोडा मैदानही जवळ आल्याने दुर्देवाने महापालिकेच्या (Pune Corporation) विषय समित्यांमध्ये बेकायदा कामांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष असे की पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असताना ‘चौक, रस्ते, वास्तूंचे’ नामकरणाच्या प्रस्तावांचा रतिबच घातला जात असून ‘बेकायदा’ ठरणारे प्रस्तावही रेटण्याचे कामही ‘नाव समिती’ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

अ‍ॅमिनिटी स्पेसमध्ये (PMC Amenity Space) शाळा उभारण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीमध्ये मंजुर करण्याऐवजी शिक्षण समितीमध्ये मंजुर करण्याचे उदाहरण ताजे असतानाच आज नाव समितीमध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक, वास्तू अथवा मैदानांचे नामकरण करण्याचे प्रस्ताव नाव समितीमध्ये मंजुर केले जातात. नामकरणाचे प्रस्ताव संबधित प्रभागातील किमान तीन सदस्यांच्या स्वाक्षरीने आल्यानंतर प्रशासकीय मान्यता घेउनच त्यांना मंजुरी मिळते असा नियम आहे. परंतू आज झालेल्या नाव समितीमध्ये अध्यक्ष धनराज घोगरे (Corporator Dhanraj Ghogare) यांनी त्यांच्या प्रभागातील विविध चौक, रस्त्यांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीपुढे आणले होते. त्यांच्या प्रभागामध्ये भाजपचे दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्य असल्याने प्रस्तांवांवर दोनच स्वाक्षरी होत्या. नियमांची पुर्तता करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ स्वीकृत नगरसेवकाची स्वाक्षरी घेतली. (Pune Corporation)

बरेतर यापैकी दोन प्रस्तावांना एकमताने मान्यता मिळाल्यानंतर विरोधकांनीही त्यांचेही अशाच प्रकारे दोन सदस्यांची स्वाक्षरी असलेले प्रस्ताव मंजुर करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्ष घोगरे यांनी ती फेटाळल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अखेर घोगरे बैठकीतून बाहेर गेले. या वादामुळे अक्षरश: त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामाही देण्याचे बोलून दाखविले. परंतू वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी बैठक पुन्हा सुरू केली. (PMC News)

 

महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे (Corporator Mahendra Pathare), अजित दरेकर (Corporator Mahendra Pathare), गणेश ढोरे (Corporator Ganesh Dhore), विशाल धनवडे (Corporator Vishal Dhanwade) यांनी आक्षेप घेतला. स्वीकृत नगरसेवकाची स्वाक्षरी चालणार नाही असा दावा त्यांनी केला. पुढे जाउन फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा सुरू झाल्याने विरोधकांनी संधी साधत नाव समितीचे कामकाज तहकुब करण्याची मागणी केली व सभा तहकुब झाली. परंतू या बेकायदा प्रस्ताव मान्यतेची व वादाची चर्चा मात्र जोरदार रंगली.

सर्वसाधारण सभाही रेटून नेली (PMC GB Meeting)
क्षेत्रिय कार्यालयातून ऑनलाईन सहभागी झालेल्या एकाही नगरसेवकाचा ‘आवाज’ पदाधिकार्‍यांपर्यंत पोहोचला नाही.
महापालिकेत आज फेब्रुवारी महिन्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभा होती.
पहिली सभा तहकुब करण्याची परंपरा सोयीने मोडीत काढत सर्व पक्षांनी एकत्र येत कामकाज केले.
एवढेच नव्हे तर निवडणुक अगदी तोंडावर असल्याने पक्षनेत्यांच्या बैठकीत मंजूर केलेले उदघाटनाच्या कार्यक्रमांचे ८७ प्रस्ताव दाखल करून तातडीने मंजुर करून घेतले.
तसेच विषय पत्रिकेवर असलेले वर्गीकरण व अन्य प्रस्तावही कुठल्याही विरोधाशिवाय एकमताने मंजूर करून घेतले.
विशेष असे की महापौर कार्यालयातून ऑनलाईन झालेल्या या सभेस सर्व पक्षीय गटनेते व पदाधिकारी उपस्थित होते.
तर नगरसेवक आपआपल्या क्षेत्रिय कार्यालयातून सभेला ऑनलाईन उपस्थित होते.
क्षेत्रिय कार्यालयातील नगरसेवकांनी काही प्रस्तावांवर बोलण्याची परवानगी मागितली.
परंतू त्याकडे दुर्लक्ष करत प्रस्ताव मांडून त्याला अनुमोदन आणि मंजुरी एवढाच ‘गतिमान’ कारभार सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाला.
शंभरहून अधिक विषयांना मान्यता देण्यात आली परंतू १५ हून अधिक क्षेत्रिय कार्यालयातून सहभागी झालेल्या एकाही नगरसेवकाचा आवाज पदाधिकार्‍यांपर्यत ‘पोहोचू’ शकला नाही.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation PMC General Body Meeting PMC News Amenity Space

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा