Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेला (Pune Corporation) यंदाच्या आर्थिकवर्षात पहिल्या नउ महिन्यांतच 4 हजार 600 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील संपुर्ण आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9 महिन्यांतच महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न वाढविण्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि महापालिका (PMC Income) प्रशासनाचेही प्रयत्न राहीले आहेत. उर्वरीत तीन महिन्यांत आणखी दोन हजार कोटी रुपयांहून उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांनी केला आहे.

 

रासने यांच्या अध्यक्षतेखाली आज महसुल समितीची आढावा बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रासने यांनी वरिल माहिती दिली. रासने (Hemant Rasne) यांनी सांगितले, की डिसेंबर अखेरपर्यंत महापालिकेला (Pune Corporation) 4 हजार 600 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील संपुर्ण आर्थिक वर्षात अर्थात 2019-20 मध्ये एवढे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्ष संपायला अद्याप तीन महिने आहेत. या तीन महिन्यांत जीएसटी व मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून 700 कोटी रुपये, बांधकाम विभागाकडून 300 कोटी रुपये, मिळकत कर विभागाकडून थकबाकी व अभय योजनेच्या माध्यमातून 700 कोटी रुपये, पथ विभागाकडून खोदाई शुल्क व दंडापोटी 500 कोटी रुपये तसेच अन्य विभागातूही उत्पन्न मिळेल, असा दावा रासने यांनी केला.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation reached last year’s revenue figure only in December this year! By the end of March, the stage of 6500 crores will be crossed – Hemant Rasne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी