Pune Corporation | पाणी बिलाचे 78 कोटी रुपये थकविल्याने पुणे मनपानं ‘पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डा’चा पाणी पुरवठा ठेवला दिवसभर बंद; उद्याही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्ड (Pune Cantonment Board) आणि स्थानीक नागरिकांना दिलेल्या नळजोडांची थकबाकी जवळपास ७७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वारंवार बैठका घेउनही बोर्ड ही थकबाकी देत नाही तर नळजोड तोडायला गेलेल्या पालिका (Pune Corporation) कर्मचार्‍यांनाही नागरिकांकडून विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) थेट कॅन्टोंन्मेट बोर्डाचा संपुर्ण पाणी पुरवठाच बंद ठेवला.

पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) पुणे आणि खडकी कॅन्टोंन्मेट बोर्डला (Khadki Cantonment Board) पाणी पुरवठा करण्यात येतो. पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्ड आस्थापनेकडे गेल्या अनेक वर्षांच्या पाणी बिलाचे ४८ कोटी रुपये थकीत आहेत. तर स्थानीक नागरिकांना पालिकेने काही वर्षांपुर्वी नळजोड दिले असून त्याला मीटरही बसविण्यात आले आहेत. नागरीकांना दिलेल्या नळजोडांचेही २९ कोटी रुपये बिल थकले आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळोवेळी कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या अधिकार्‍यांसोबत बैठका घेतल्या आहेत. तसेच वेळोवेळी नोटीसही दिल्या आहेत. तसेच थकबाकीदार नागरिकांचे नळजोड तोडण्यासाठी पालिकेने कारवाई देखिल केली होती. थकबाकी भरावी यासाठी संबधितांना लोक अदालतीमध्ये उपस्थित राहाण्यासाठी नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. परंतू यानंतरही बोर्डाने अद्याप थकबाकी भरलेली नाही. तसेच कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना नागरिकांकडून दमबाजी करण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाने पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डचा पाणी पुरवठा आज दिवसभर बंद ठेवला आहे. तसेच उद्याही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. परंतू महापालिकेने कशासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला होता, हे उशिरापर्यंत न समजल्याने आज तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा बंद राहीला असावा असा समज नागरिकांना झाला होता. संध्याकाळनंतर घरात साठवलेले पाणी संपल्याने झालेल्या अडचणीमुळे नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची चांगलीच तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले.

 

पुणे कॅन्टोंन्मेंट एरियात यापुढे दिवसाआड किंवा ठराविक वेळीच पाणी पुरवठा?

पुणे शहराचा भौगोलिक विस्तार होत असतानाही शहराच्या विविध भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. तुलनेने अगदी इंग्रज राजवटीपासून अस्तित्वात असलेल्या कॅन्टोंन्मेंट भागात मात्र चोवीस तास पाणी पुरवठा होतो. लोकसंख्या व शहराची वाढ होत असताना कॅन्टोंन्मेंट भागात मात्र मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. ही बाबही आता चर्चेच्या अग्रस्थानी आली असून लवकरच कॅन्टोंन्मेंट बोर्डला एक दिवसाआड अथवा दिवसांतील ठराविक वेळेतच पाणी पुरवठा करण्याबाबत पालिका पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation shuts off water supply to Pune Cantonment Board; Tomorrow …

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nia Sharma | ‘सात समंदर पार’ या गाण्यावर निया शर्मानं केला बोल्ड डान्स, व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली ‘आग’

HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Nana Patekar On Thackeray Government | सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकरांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘…उध्दवा अजब तुझे सरकार’

 

Leena Nair | एकेकाळी ट्रेनी असलेल्या भारतीय वंशाच्या लीना नायर बनणार फ्रान्सच्या सर्वात मोट्या कंपनीच्या सीईओ

 

Pune Crime | कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक ! पतपेढी बंद करुन चेअरमनसह सर्व जण झाले फरार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना