Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीकडून अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | अग्निशमन दलाकडून (Fire brigade) उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या (service charges) सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष (Standing Committee Chairman) हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Corporation)

 

पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणाऱ्या 500 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या आणि 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतींना अनुक्रमे 25 रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि 50 रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे. (Pune Corporation)

 

रासने पुढे म्हणाले, 15 ते 40 मीटर उंचीच्या इमारतींसाठी (building) प्रती चौरस मीटर 100 रुपये (किमान एक लाख रुपये), 40 ते 70 मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 250 रुपये (किमान अडीच लाख रुपये), 70 ते 100 मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर 400 रुपये (किमान चार लाख रुपये), 100 ते 150 मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 500 रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि 150 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 600 रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation Standing Committee approves revised rates of fire service charges

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा