Pune Corporation | पुणे महापालिकेची शहर सुधारणा समिती झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’ ! नियमांची ‘ओढाताण’ करून बोलविलेल्या खास सभेत ‘विषयांना’ मंजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिका (Pune Corporation) निवडणुक जवळ आली असताना पुणे महापालिकेची (Pune Corporation) ‘शहर सुधारणा समिती’ प्रचंड ऍक्टीव्ह झाली आहे. अवघ्या तीनच दिवसांपुर्वी शहर सुधारणा समितीची (shahar sudharna samiti) बैठक झाली असताना प्रलंबित ठेवलेल्या दोन विषयांसाठी सोमवारी विशेष सभा बोलावून दोन्ही विषय मंजुर करण्यात आले. विशेष असे की यापैकी एक विषय पुढील सभेत घेण्याचे ठरले असतानाही ‘नियमांची ओढाताण’ करून हा विषय झटपट झालेल्या विशेष सभेत आणल्याने ‘सुधारणे’ च्या हेतूबद्दल ‘खमंग’ चर्चा रंगली आहे.

शहर सुधारणा समितीची मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.८ ऑक्टोबर) ला नियमीत पाक्षिक सभा झाली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर नसलेला परंतू सभेपुढे आलेला
कर्वेरस्त्यावरील गरवारे शाळेसमोरील (garware school) स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मारक (swatantryaveer savarkar smarak) हे स्वा. वि.दा. सावरकरांचे
जीवनप्रसंगावरील प्रदर्शनाकरिता असणारे स्मारक ३० वर्षे कालावधीसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर पुणे महापालिका आणि विवेक व्यासपीठ अशा संयुक्त प्रकल्पाला ३० वर्षे कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव होता.

 

विशेष असे की, यापुर्वी २०१८ मध्ये पाच वर्षे कराराने याच दोन्ही संस्थांना पाच वर्षासाठी देण्यात आले आहे. २०२३ मध्ये ही मुदत संपणार असताना भाजपच्या (BJP) सदस्यांनी दोन वर्षे अगोदरच ३० वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव दिला.
शहर सुधारणा अध्यक्ष आनंद रिठे (corporator anand rithe) यांनी या विषयासाठी अवघ्या तीन दिवसांत विशेष सभा घेउन तो बहुमताने मंजूरही करून घेतला.
विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अद्याप दोन वर्षे कालावधी बाकी असताना मंजुरीसाठी घाई करू नये म्हणत याला विरोध केला.

विशेष सभेसाठी आणखी एक विषयपत्र होते ते औंध स.नं. १ व स.नं. १ पार्ट या मिळकतीमधून पश्‍चिम पूर्व जाणार्‍या १२ मी. रस्ता रुंदीचा. उपमहापौर सुनिता वाडेकर
(deputy mayor sunita wadekar) यांनी औंध (Aundh) स.नं. १ मधून औंध स्मशानभूमीकडे जाण्यासाठी राजीव गांधी पूल ते स्मशानभूमीपर्यंतचा
६ मी. रुंदीचा रस्ता १२ मी. रुंद करण्याचा प्रस्ताव मागील वर्षी ३१ ऑगस्टला दिला होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून आजूबाजूला झालेल्या
लोकवस्तीमुळे रहदारी वाढली आहे.
यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे महापालिका (Pune Corporation) अधिनियमाच्या कलम २०५ (अ)
अन्वये रुंदीकरण करावे असे कारण त्यांनी यामागे दिले होते.
विशेष असे की, मागीलवर्षी ११ सप्टेंबरला शहर सुधारणा समितीने या प्रस्तावाला मान्यताही दिली आहे.
तसेच यावर्षी जुलैमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्तांनीही या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली.

 

तर महापालिका आयुक्तांनी यावर सकारात्मक अभिप्राय देउन २० सप्टेंबर २०२१ मध्ये हा अभिप्राय विचारासाठी शहर सुधारणा समितीपुढे ठेवला.
साधारण १४ महिन्यांच्या प्रवासानंतर हा अभिप्राय मान्यतेसाठी ८ ऑक्टोबरच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीपुढे ठेवला होता.

आठ ऑक्टोबरच्या समितीच्या बैठकीमध्ये या दोन्ही विषयांवर चर्चा झाली.
यापैकी सावरकर स्मारक चालविण्यास देण्याचा प्रस्ताव पुढील पाक्षिक सभेत घेण्याचा निर्णय झाला.
तर औंध येथील रस्ता रुंदीच्या विषयावर जागा पाहाणी करून निर्णय घेण्याचे ठरले.
मात्र, त्याचदिवशी संध्याकाळी शहर सुधारणा समितीतील भाजपच्या सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांचा फेरविचार करून तातडीने खास सभा बोलावून मान्यता द्यावी,
असे पत्र समिती अध्यक्ष आनंद रिठे यांना दिले.
रिठे यांनी देखिल तातडीने सदस्यांच्या मागणीनुसार या दोन्ही विषयांसाठी सोमवारी सकाळी विशेष सभा बोलवावी असे आदेश देत सभेचे आयोजन केले.
शनिवार, रविवार हे दोन दिवस महापालिकेला सुट्टी असताना हे दोन्ही विषय सोमवारी विशेष सभा घेउन मान्य करण्यात आले.
या दोन्ही प्रस्तावांना विरोधी पक्षांनी विरोध केला.
परंतू बहुमताच्या जोरावर अवघ्या तीनच दिवसांच्या आतमध्ये विशेष सभा बोलावून बहुमताच्या जोरावर प्रस्ताव ‘रेटून’ नेण्यामागील भाजपच्या भूमिकेबाबत ‘संशयाचे ढग’ दाटून आले आहेत.

 

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation’s city improvement committee (shahar sudharna samiti) became ‘active’! Approval of ‘subjects’ in a special meeting called by ‘pulling’ the rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’

Modi Government | मोदी सरकार ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना देणार पदोन्नती, 15000 रुपये महिना वाढेल पगार