Pune Corporation | पुणे महापालिकेचा ‘चमको’ कारभार ! शहरातील रस्त्यांवरील ‘खड्डे’ बुजविण्याकडे दुर्लक्ष; मात्र, एकाच रात्रीत मनपा भवनमधील रस्त्याचे डांबरीकरण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पावसाचे कारण देत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास टाळाटाळ करणार्‍या महापालिका प्रशासनाने (Pune Corporation) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका भवनच्या (Pune Corporation) प्रांगणातील चांगल्याच रस्त्याचे एका रात्रीत डांबरीकरण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही प्रशासनाकडून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्याच्या कामाला गती दिली गेली नाही.

थोडा पाऊस जास्त झाल्यानंतर पुन्हा या खड्ड्यांत पाणी साठण्याचे प्रकार होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी जलवाहीन्या, सांडपाण्याच्या वाहीन्या आणि सेवा वाहीन्या टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई झाली होती. या खोदाईनंतर रस्ते पुर्ववत करण्यास प्रशासनाकडून विलंब झाला. त्याचप्रमाणे जे खड्डे बुजविले गेले, त्याची शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती केली गेली नाही. अनेक ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट टाकून रस्ते दुरुस्ती केली गेली पण त्याच ठिकाणी रस्ते खचले गेले. शहरात ही परीस्थिती असताना महापालिकेच्या इमारतीच्या आवारातील रस्ता चकाचक केला गेला आहे. गुरुवारी एका रात्रीत या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी हे डांबरीकरण केले गेले आहे.

 

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation’s ‘shining’ management! Neglecting to fill ‘pits’ on city roads; However, asphalting of the road in PMC Bhavan in one night

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai High Court | उच्च न्यायालयाचा राज्यपालांना ‘झटका; विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निर्णयाची करून दिली जाणीव

Pune Crime | पुण्याच्या विमानतळाजवळील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला लुटले; परिसरात खळबळ

Pune Crime | तरुणीला ‘क्या माल है’ म्हणत केला विनयभंग, चंदननगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या