Pune Corporation | पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील 42000 बेकायदा फ्लेक्स, बॅनर हटविले

गुन्हे दाखल करण्यासोबतच 1 लाख 66 हजार दंडाची केली वसुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | महापालिकेने शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणारे बेकायदा होर्डींग, पोर्स्टर्स, बोर्ड- बॅनर्स आणि झेंडे (Illegal Flex Banner In Pune) लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई (PMC Action) करण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून कडक पावले उचलली आहेत. महापालिकेने (Pune Corporation) १ डिसेंबरपासून आतापर्यंत शहरातील तब्बल ४१ हजार ९०५ बोर्ड, बॅनर काढले असून एक गुन्हा दाखल करण्यासोबतच १ लाख ६६ हजार दंडही वसुल केला आहे.

 

महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने या कालावधीत २० बेकायदा होर्डींग, ८ हजार ५०९ बोर्ड, ५ हजार ९८ बॅनर, ६ हजार ३२० फ्लेक्स, २ हजार ३०२ झेंडे, ११ हजार ५४३ पोस्टर्स, ५ हजार १४५ किऑक्स आणि इतर २ हजार ९६८ बेकायदा जाहिरातींवर कारवाई केली. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यासाठी ६ प्रकरणे पोलिस दलाकडे पाठविण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये आतापर्यंत १ लाख ६६ हजार दंडही वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय लांडगे (PMC Vijay Landge) यांनी दिली आहे.

 

बेकायदा जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर आणि झेंडे काढण्याच्या खर्चापोटी संबधितांकडून एक ते पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
शहरात मोठ्याप्रमाणावर जाहीरात फलक उभारण्यात आले आहेत.
यासोबतच बेकायदा बोर्ड, बॅनर आणि झेंड्यांच्या प्रत्येक रस्त्यावरील मोठ्या संख्येमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बेकायदा फलक, बोर्ड, बॅनर काढण्यात येतात. परंतू त्या व्यतिरिक्त कुठलिच कारवाई होत नसल्याने बेकायदा बोर्ड, बॅनरचा अगदी सुळसुळाट झाला आहे. दुसरीकडे हे बेकायदा फलक काढण्यासाठी महापालिकेला (Pune Corporation) मोठ्याप्रमाणावर खर्च येतो. तसेच मनुष्यबळही मोठ्याप्रमाणावर लागते. दुसरीकडे फलक काढण्यावरून पालिकेचे कर्मचारी व संबधित नागरिक अथवा कार्यकर्त्यांचाही सातत्याने वाद होतो.

या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने २००९ मध्ये सर्वसाधारण सभेने मंजुर केलेल्या धोरणाची कडक अंमलबजावणी करून
बेकायदा बोर्ड, बॅनर लावणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे.
त्यानुसार एक ते १० बोर्ड लावणार्‍यांकडून कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तसेच बेकायदा जाहिरात फलक (होर्डींग) लावणार्‍यांना नोटीस बजावून संबधित फलक नियमान्वीत होत
असेल तर त्याच्याकडून परवाना शुल्क व जेंव्हापासून फलक उभारला असेल तेंव्हापासूनचे शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
परवानगी दिलेल्या जाहिरातदारांकडून नुतनीकरणाचे शुल्क भरण्यास विलंब झाल्यास तीन महिन्यांपर्यंत विलंब असेल तर २५ टक्के,
सहा महिन्यांपर्यंत ५० टक्के व त्यापेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर १०० टक्के विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation’s sky signs department removed 42000 illegal flakes and banners in the city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Varsha Gaikwad | सोमवारपासून शाळा सुरू होणार ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत

 

EPFO | 30 वर्षापेक्षा कमी वयात सुरू केली नोकरी आणि 18 हजारपेक्षा कमी असेल पगार तर निवृत्तीला किती मिळेल फंड, जाणून घ्या?

 

Rhea Chakraborty | अलिबागच्या ‘या’ व्हिलामध्ये रिया चक्रवर्ती करतेय तिचा क्वालेटी टाईम स्पेंड; एका रात्रीचा रेंट ‘एवढा’ की…