Pune Corporation | पुणेकरांना तुर्तास दिलासा नाहीच? महापालिकेचा सुधारित आदेश जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना बधितांचा (Corona virus) मोठा आकडा असलेल्या पुणे शहरात सध्या परिस्थिती आटोक्यात आली आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) आता शहरातील निर्बंधाबाबत सावध भूमिका घेण्याचे ठरवले आहे. याबाबत पुणे महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी आज पुणे शहरातील निर्बंधाबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार पालिका क्षेत्रात लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहणार आहेत. यावरून पुणेकरांना शहरातील निर्बंध हटण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

पुणे शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी मागच्या बैठकीत 15 जुलै रोजी कोरोना प्रतिबंधक आदेश लागू केला होता. या आदेशाची मुदत आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज सुधारित आदेशानुसार तो कायम ठेवला असल्याचं स्पष्ट झालं आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग बंदच राहणार आहेत. तसेच, ऑनलाइन शिक्षणास मात्र परवानगी असणार आहे. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांना देखील लागू असणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा सुधारित आदेश लागू राहणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा विचार करता कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पुणे जिल्ह्याला बसला
आहे. मात्र, पुणे पुणे जिल्ह्यात परिस्थिती लवकर आटोक्यात आली आहे. रुग्णाची संख्या देखील
कमी झाली आहे. दरम्यान, सध्या राज्य सरकार (State Government) काय निर्णय घेणार आहे
यावर आता निर्णय असणार आहे. तसेच, करोना पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी
असलेले व अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी असलेले जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांमध्ये निर्बंधांत आणखी
शिथीलता देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या (State Government) विचाराधीन असल्याने यावर
सकारात्मक निर्णय झाल्यास पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा

Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता

Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corporation | restrictions currently in force in pune will remain in place

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update