Pune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा शिवसेनेच्या नीलेश गिरमेंचा आरोप, म्हणाले – संबंधितांवर गुन्हे दाखल करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका (Pune Corporation) झोन क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय (PMC Sinhagad Road Regional Office) हद्दीत कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांना सोई सुविधा देण्यासाठी 12 एप्रिल 2020 ते 31 मे 2021 या चौदा महिन्याच्या कालावधीत 6 कोटी 88 लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार (Fraud) झाला असून जवळपास 3 कोटींचा अपहार झाला आहे, याची पालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींवर गुन्हे दाखल करून नागरिकांचा पैसा महापालिका तिजोरीत जमा करावा, अशी मागणी शिवसेनेचे खडकवासला मतदारसंघाचे विभाग प्रमुख नीलेश गिरमे (Shiv Sena’s Khadakwasla constituency division chief Nilesh Girme) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आणि सोई सुविधा पुरविण्यासाठी कै. मुरलीधर लागयुडे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यान केंद्र (pl deshpande garden pune), सिंहगड इन्स्टिट्यूट (sinhgad institute of management) , धायरी येथील पालिकेची (Pune Corporation) पोकळे शाळा, जनता वसाहत (janta vasahat pune) येथील पालिकेची शाळा आदी ठिकाणी ही सेंटर्स उभारण्यात आले होते. यामध्ये विलगीकरण कक्ष, स्वॅब तपासणी केंद्र उभारण्यात आली होती.

या वरील केंद्रावर पॉझिटिव्ह रुग्णांना चौदा महिन्यात चहा, नाश्ता, जेवण, बिस्किटे, पाण्याची बाटली आदी बाबीं तब्बल 4 कोटी 59 लाख 23 हजार 696 रुपये एवढा खर्च लावण्यात आला आहे.
येवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील प्रत्यक्षात मात्र रुग्णांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविण्यात आले होते.
त्यामुळे अनेक रुग्णांनी याविषयी तक्रार केली होती.

त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विविध सेंटर उभे करताना.
त्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये पत्र्याचा मांडव, पत्रा-पार्टीशन, कपडा-पार्टीशन, गाद्या पुरविणे, खुर्च्या पुरविणे, प्रतिबंधित क्षेत्रात लोखंडी पत्र्याचे पार्टीशन, शौचालयांचे साफसफाई करणे, विद्युत विषयक कामे, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मजूर, बोर्ड, बॅनर पुरविणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर, लागणारे साहित्य, फर्निचर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, फॅब्रिकेशन तसेच कॉंक्रिटीकरण करणे यासाठी 2 कोटी 25 लाख 93 हजार 551 रुपये खर्च करण्यात आला आहे.

17 फेब्रुवारी 2021 ला झालेल्या ठरावानुसार यातील एका कामासाठी 27 लाख 40 हजार 169.65 पैसे एवढी रक्कम मान्य करण्यात आली होती.
परंतु त्याच कामासाठी 69 लाख 65 हजार 213.56 पैसे पालिकेच्या वतीने अदा करण्यात आले.
कोणत्याही ठेकेदाराला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम पालिका देवू शकत नाही.
त्यामुळे येथे संगनमत करून अशा रकमा अदा करण्यात आल्या आहेत.

 

माहिती अधिकारात या विषयी माहिती मागितल्या नंतर देखील प्रशासनाने तब्बल 50-55 दिवसांचा वेळ लावला.
अर्ज केल्यानंतर काही दिवसातच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तातडीने झाल्या असल्याने
या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सुप्त हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर आयुक्तांना (Pune Corporation) आज याबाबत पत्र देत असून या भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा या विषयाला घेवून न्यायालयात (Court) जाणार आहोत.

Web Titel :- Pune Corporation | Shiv Sena’s Nilesh Girme alleges embezzlement of Rs 3 crore in NMC, says – file charges against concerned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mumbai Expressway | पुणे मुंबई हायवेवर लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली

Traffic police | राज्यातील 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

Pune Police | पुणे पोलिसांकडून ‘माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेचे आयोजन; मिळणार रोख बक्षिसे अन् बरंच काही… (व्हिडीओ)