Pune Corporation | ‘भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून पुणे मनपातील भ्रष्टाचाराने कळस गाठला’ – राष्ट्रवादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | ब्लॅक लिस्टेड कंपनीचे संचालक असलेले भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनीच दुसर्‍या नावाने सुरू केलेल्या कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पुण्यात आल्यानंतर महापालिकेतील (Pune Corporation) भ्रष्टाचाराने (corruption) कळस गाठला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी केला असून यासंदर्भात राज्य शासनापासून (Maharashtra Government) सर्वच तपास यंत्रणांकडे दाद मागणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रशांत जगताप यांनी सांगितले, की स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये
1 हजार 600 बहुद्देशीय कामगार पुरविण्याची निविदा मान्य करण्यात आली आहे.
हे काम भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस (krystal integrated services pvt. ltd) या कंपनीला मिळाले आहे.
यासोबतच लाड यांच्याच कंपनीला शहरातील पार्किंगचा दिर्घकाळ ठेका मिळावा अशा अटी शर्ती घालून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
प्रसाद लाड हे संचालक असलेल्या ईगल कंपनीला यापुर्वी राज्य शासन व काही महापालिकांनी ब्लॅक लिस्टेड केले आहे.

जी कंपनी ब्लॅक लिस्टेड आहे तिच्या संचालकांना अन्य कंपनीत संचालक राहाता येत नाही,
हा नियम आहे. परंतू तो धाब्यावर बसवून प्रशासन आणि सत्ताधार्‍यांनी लाड यांच्या कंपनीला काम दिले आहे.
लाड यांच्या कंपनीला काम देण्यावरून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये बैठकीच्या दिवशी प्रचंड वाद झाला. या वादात महापौरांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची आमची माहीती आहे.
यासोबतच समाविष्ट ११ गावांमध्ये ड्रेनेज लाईन टाकणे व एसटीपी प्लांट उभारणे अशा दोन्ही कामांच्या निविदा एकत्र करुन एकाच कंपनीला काम मिळावे अशी हातचलाखी करण्यात आली आहे.
या कामाची निविदाही ३९२ कोटी रुपयांची आहे. शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी पुणे
शहराला कर्जाच्या खाईत लोटून हजारो कोटी रुपयांच्या योजना आणण्याच्या प्रयत्न आहेत.

 

यामागे विकासापेक्षा भ्रष्टाचारच हा प्रमुख उद्देश आहे. भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातून आमदार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.
महापालिका भवन सोडून सर्व शहरच विकायला काढले आहे.
एवढेच नव्हे तर मोठे बहुमत असताना त्याच त्या पदाधिकार्‍यांना महत्वाच्या पदावर संधी देण्यासाठी
लिलावच लावला आहे, असा आरोप जगताप यांनी यावेळी केला. याप्रसंगी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (pmc opposition leader deepali dhumal), स्थायी समिती सदस्य बंडू गायकवाड
(standing committee member bandu gaikwad) व नंदा लोणकर
(standing committee member nanda lonkar) उपस्थित होत्या.

पक्षाच्या भुमिकेविरोधात निविदांना पाठींबा देणार्‍यांची गय केली जाणार नाही

समाविष्ट गावांतील ड्रेनेज लाईन तसेच सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा
विरोध असेल असे मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी निर्णय घेतला होता.
परंतू मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हे दोन्ही प्रस्ताव एकमताने मंजूर झाले आहेत. याप्रकरणी बैठकीला उपस्थित पक्षाच्या तीनही सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत जगताप यांनी उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
विरोधी पक्षनेत्या आणि मी स्वत: निरोप दिल्यानंतरही पक्षाच्या विरोधात भुमिका घेणे हे पक्षशिस्तीच्या विरोधात आहे.

 

सत्ताधार्‍यांनी अन्य एका विषयावरून झालेल्या गोंधळाचा लाभ घेत ड्रेनेज लाईन व सुरक्षा रक्षकाचा विषय झटपट पुकारून मान्यही करून घेतला, असा प्राथमिक खुलासा तीन सदस्यांनी दिला आहे.
परंतू सभेचे रेकॉर्डींगही आम्ही घेतले असून पवार यांच्या उपस्थितीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदेचा फेरविचार देण्यात आला असून ऍमेनिटी स्पेस
(pune amenity space) भाडेतत्वावर देणे, समाविष्ट गावातील ड्रेनेज लाईन, सुरक्षा रक्षक नियुक्ती,
ई व्हेईकल्स, सदनिकांची विक्री या प्रस्तावांबाबत राज्य शासनाकडे तसेच अन्य तपासयंत्रणांकडेही तक्रार देणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

महापालिकेत राष्ट्रवादीचे एकमेव प्रतिनिधी असल्याचे प्रशांत जगताप दिसतात. महापालिकेतील सर्व निविदांना ते विरोध करतात. परंतू याच निविदांच्या मान्यतेला त्यांच्याच पक्षाचे सभासद एकमताने पाठींबा देतात. विरोधी पक्षनेत्या देखील त्यांच्या बरोबर नसतात. त्यामुळे जगताप यांनी संघटनेवर बोलण्यापेक्षा त्यांच्याबरोबर कोण कोण सभासद आहेत याची स्पष्टता द्यावी. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या तसेच विविध समित्यांमधील त्यांच्याच पक्षाचे सभासद त्यांच्या या मनमानी कारभाराला वैतागले आहेत.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका (PMC House Leader Ganesh Bidkar)

 

Web Title : Pune Corporation | ‘Since BJP state president Chandrakant Patil came to Pune, corruption in Pune has reached its peak’ – NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?

Pune Crime Branch Police | पुण्यात भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 10 लाखाचा ऐवज जप्त

Sangli Crime | सांगलीत हत्याराची तस्करी करणार्‍या टोळीला अटक; 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त