Pune Corporation | सर्वोच्च न्यायालयाचा पुणे मनपाला दणका ! HCMTR प्रकल्प प्रकल्पाबाबत दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Corporation | सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) शुक्रवारी सुनावणी मध्ये पर्यावरणीय मंजुरीशिवाय पुणे मनपाचा HCMTR प्रकल्प (HCMTR project of Pune Corporation) पुढे जाता येणार नाही असा दणका पुणे मनपाला दिला आहे. एच सी एम टी आर चा मोठा विस्तार आणि सोबतच संभाव्य पर्यावरणीय हानी बघता राष्ट्रीय हरित अधिकरणाने नोव्हेंबर 2020 मध्येच पुणे मनपा (Pune Corporation) यांना पर्यावरणीय मंजूरी घेण्याचा निर्देश दिला होता, आणि शुक्रवारच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील हाच निर्देश कायम केला.

पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEF) तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या NGT मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हा प्रकल्प ‘परिसर विकास’ प्रकल्पामध्ये मोडतो आणि यासाठी आगाऊ पर्यावरणीय मंजुरी घेणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले होते. पुणे शहरामधून महानगरपालिका प्रस्तावित एच सी एम टी आर हा 36 किलोमीटर लांब 80 फूट रुंदीचा पुला सारखा हा मार्ग आहे. न्यायालयामध्ये पुणे मनपा यांनी  HCMTR हा पर्यावरणीय मंजुरीची गरज नसणाऱ्या मुंबई समुद्र किनारी मार्गाचे (costal road) उदाहरण देऊन त्यांचा मुद्दा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सारंग यादवाडकर, मुख्य याचिकाकर्ता (Sarang Yadwadkar Chief Petitioner) यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी राष्ट्रीय हरित अधिकरणामध्ये सुद्धा एच सी एम टी आर चा खूप मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम पुणे शहराच्या पर्यावरणावर होणार असे स्पष्ट केले होते. हा रस्ता दाट वस्तीच्या ठिकाणांहून, हॉस्पिटल, शाळा, पाण्याचे स्त्रोत इत्यादी ठिकाणांहून जात होता. हेच नाही तर या प्रकल्पाचा टेकड्यांवरून जाऊन टेकड्यांचा, झाडांचा आणि वस्त्यांचा विध्वंस होऊ नये म्हणून भरपूर नागरिकांनी आणि पर्यावरणीय गटांनी याचा विरोध केला आहे.

एवढंच नाही तर hcmtr मुळे अगदी पुणे शहराच्या भर वस्तीत आधीच उच्च पातळीवर पोहोचलेले प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ होईल. परिसरचे सुजित पटवर्धन म्हणतात: 1982 साली जो विकास आराखडा आखला गेला होता तो फक्त आणि फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी. पुणे मनपा याचा अगदी उलट यामध्ये चार मार्ग खासगी गाड्यांसाठी बांधत आहे ज्याच्यामुळे हा प्रक्लप अधिक महागडा झालाय.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

वाहतूक तज्ञ प्रांजली देशपांडे म्हणतात एच सी एम टी आर वर शाश्वत अशी विजेवर चालणाऱ्या
बी आर टी सिस्टिम राबवावी म्हणजे हवा आणि आवाज प्रदूषण कमी होईल,
खर्च कमी होईल आणि क्षेत्र देखील व शहराला त्याच्या शाश्वत वाहतुकीचे ध्येय साधता येईल.
कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयााच्या या जनहितार्थ, वैज्ञानिक आणि शाश्वत निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title : Pune Corporation | Supreme Court orders Pune Municipal Corporation not to proceed with HCMTR project without environmental clearance

 

TCS Recruitment | कामाची गोष्ट ! जगातील सर्वात मोठी IT कंपनी देतीय 40 हजार लोकांना नोकरी; इन्फोसिसला सुद्धा पाहिजेत यावर्षी 26 हजार फ्रेशर्स

IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘PMPML’ च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती