Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | शहरातील वाहतूक सुरळित करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या बहुचर्चित  ATM System अर्थात ऍडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या (adaptive traffic management system) देखभाल दुरूस्तीच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला आज सर्वसाधारण सभेत (PMC General Body Meeting) बहुमताने मान्यता देण्यात आली. विशेष असे की मागील महिन्यांत स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने फेरविचार दिला होता. तर फेरविचारासोबत आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज पुन्हा एकदा ‘युटर्न’ घेतला तर फेरप्रस्ताव देणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सभागृहातून गायब झाले होते. त्यामुळे एकीकडे टोकाचा राजकिय विरोध करणारे विरोधकही ‘आर्थिक’ विषयावर तलवारी म्यान करत असल्याचे चित्र आज सर्वसाधारण सभेत (Pune Corporation) पाहायला मिळाले.

 

पुणे शहरातील वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी (Pune Smart City) कंपनीने ATMS System बसविण्यासाठी २०१८ मध्ये निविदा काढल्या होत्या. पहिल्या टप्प्यात शहरातील २६१ चौकांपैकी १२५ चौकांमधील सिग्नल एकमेकांशी जोडून अधुनिक यंत्रणेने नियंत्रीत करणे. गर्दीनुसार सिग्नलचे टायमिंग सेट करणे, यामुळे प्रवासाची वेळ कमी करून गती वाढविणे हा ही यंत्रणा बसविण्यामागील प्रमुख उद्देश आहे. परंतू २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या या निविदांना सुरवातीच्या काळात काहीसा विरोध झाला होता. गल्लीबोळांचे अरुंद रस्ते आणि वाहनसंख्या अधिक असलेल्या शहरात ठराविक चौकांमध्ये ही यंत्रणा राबविण्यावरून मतभेदही झाले होते.

 

 

दरम्यान २०१९ मध्ये राज्यातील सरकार बदलले. स्मार्ट सिटी कंपनीच्या मागील महिन्यांत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय संचालकांनी ‘गुपचूप’ निविदा मंजूर केली. सुमारे १०२ कोटी ६२ लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या मे. विंदिया टेलिलिंक्स प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले. पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल दुरूस्ती करणे यासाठी प्रतिवर्षी ११ कोटी ५८ लाख असा एकूण ५७ कोटी ९४ लाख रुपये खर्चही येणार आहे. स्मार्ट सिटीकडे पैसे नसल्याने हा खर्च महापालिकेने (Pune Corporation) करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला.

 

महापालिकेवर लादलेल्या सुमारे ५८ कोटी रुपयांच्या दायित्वाबद्दल प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये पाठींबा देणारे विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जागे झाले . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सत्ताधार्‍यांनी गोंधळात हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप करत याविरोधात आंदोलन केले तसेच फेरविचाराचा प्रस्तावही दिला. तसेच या प्रस्तावाचा फेरविचारही देण्यात येणार असून यापुर्वी चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेेले ५ प्रस्ताव व हा प्रस्ताव विखंडीत करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या स्थायी समितीतील सदस्यांनाही ‘अभ्यास’ पुर्वक निर्णय का घेत नाही याबाबतही जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले होते.

 

 

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) यांनी या प्रस्तावाचा फेरविचार दिला आहे.
तसेच कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे (corporator arvind shinde) यांनी त्यांच्यासह कॉंग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या स्वाक्षरीने स्वतंत्र फेरविचार दिला आहे.
यावरून महापालिकेतील कॉंग्रेसमध्ये ‘समन्वय’ नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये २०१८ मध्ये या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने यासंदर्भात आलेली निविदा वादग्रस्त ठरली होती.
ती बाजूला ठेवण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात तर निविदेची फाईलच गहाळ झाल्याचे प्रशासनाने सांगितले होते.
मात्र, अचानक काल एका दिवसांत फाईल मंजुरीसाठी आली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून सत्ताधारी
पक्षाच्या माजी सभागृहनेत्यानेच प्रशासनावर दबाव टाकून हा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला.
याप्रकरणी हे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकार्‍यांचे सीडीआर तपासावेत,
अशी मागणीही केली होती. शंभर कोटी रुपयांच्यावर गैरव्यवहार असल्याने आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत.
ही तक्रार करण्यात मदत करावी असे विनंतीपत्रही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना देणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली होती.

 

परंतू आज हा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे येणार हे माहिती असतानाही प्रशांत जगताप, आबा बागुल आणि अरविंद शिंदे यांच्यापैकी एकहीजण सभेत थांबला नाही. विशेष असे की हे तिघेही सकाळपासून सभेसाठी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपने एटीएमएस यंत्रणा १२५ अधिक १०० अशा २२५ चौकांमध्ये कार्यन्वीत करावी अशी उपसूचना दिली. यावर सभागृहात मतदान झाले. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर सभागृहात उपस्थित असलेले कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे (corporator avinash bagwe) यांच्यासह कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनी प्रस्तावा विरोध केला. शिवसेना तटस्थ राहीली. अखेर ४५ विरूद्ध ३ मतांनी उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर झाला.

 

Web Title :- Pune Corporation | The Congress, which has been roaring to report crores of corruption in the ATM system to the ED, has ‘disappeared’ from the House during the approval of the senior NCP corporator’s proposal! The Nationalist Congress Party (NCP) has joined hands with the BJP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा