Pune Corporation | पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना ‘फुटली’? दोनच दिवसांत होणार स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना फुटली? (PMC Election Model Ward Formation) हे दोनच दिवसांत स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्र. 13 हा द्विसदस्यीय प्रभाग होणार आहे. सध्याचा प्रभाग क्र. 9 अर्थात बाणेर – बालेवाडी (Baner-Balewadi) मधील बाणेर (Baner)  व बालेवाडीचा (Balewadi) काही भाग व सूस (Sus) व म्हाळुंगे (Mahalunge) ही नव्याने गावे एकत्रित द्विसदस्यीय प्रभाग रचना केल्याचे ‘व्हायरल’ झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. (Pune Corporation)

 

महापालिकेने प्रभाग रचना करताना त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले आहेत. एवढेच नाहीतर सध्याचा बाणेर – बालेवाडी प्रभाग क्र. 9 चे विभाजन करून बाणेर, बालेवाडीचा काही भाग व सूस या नव्याने समाविष्ट गावांचा सहभाग करून द्विसदस्यीय प्रभाग रचना केल्याचे अगदी नाकाशासह व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा झाली. काही स्थानिक मंडळींनी याविरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. (Pune Corporation)

 

या याचिकेनंतर सावध झालेल्या राज्य निवडणूक आयोगाने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Corporation) प्रारूप प्रभाग रचनेत जाणीवपूर्वक लक्ष घातले. संपूर्ण शहरातील प्रारूप प्रभाग रचनेतील नैसर्गिक सीमारेषेच्या 24 हुन अधिक त्रुटी काढून स्वत:च्या अखत्यारीत त्या दुरुस्तही करून घेतल्याची चर्चा अधिकारी वर्गात आहे.

 

 

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्याचा आदेश देताना प्रभाग निहाय लोकसंख्येनुसार 58 प्रभाग जाहीर केले आहेत. 1 फेब्रुवारीला प्रत्यक्षात नकाशे प्रसिद्ध केले जाणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार 9 क्रमांकाचा प्रभाग हाच नवीन त्रिसदसिय रचनेत प्रभाग क्र. 13 होण्याची होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास ‘व्हायरल’ झालेली प्रभाग रचना ‘सत्य ‘ असल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यावरून शहराच्या राजकारणात मोठा राजकीय धुरळा उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु यासाठी आणखी दोन दिवस अर्थात मंगळवारी प्रभाग रचना जाहीर होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

 

सध्याच्या प्र. 9 बाणेर – बालेवाडी मध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक आहे.
हे चारही नगरसेवकांचे प्रमुख कार्यक्षेत्र बाणेर, बालेवाडीच आहे.
नवीन रचनेत हा प्रभाग द्विसदस्यीय झाल्यास भाजपच्या तीन पैकी एका नगरसेवकाला एकतर
लगतच्या वॉर्डमध्ये प्रयत्न करावे लागतील किंवात्याचा पत्ता कट होईल अशी भीती आहे.
अशातच या प्रभागात राष्ट्रवादी मधून आलेल्या काही बिनीच्या कार्यकर्त्यांनी भाजपकडुन जोरदार तयारी केली आहे.
भाजपमध्ये उमेदवारी वरून जोरदार स्पर्धा होण्याची शक्यता असून याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होण्याची शक्यता असल्याने
पुढील दोन दिवस त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढविणारे ठरणार आहेत.

 

Web Title :- Pune Corporation | The draft ward structure for the upcoming elections of Pune Municipal Corporation has split? It will be clear in two days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा