Pune Corporation | प्रभाग रचनेचा कच्चा आराखडाच अद्याप अपूर्ण ! आराखडा सादर करण्यास मुदतवाढ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.30) संपुष्टात येत आहे. मात्र आद्यप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने मुदतीत आराखडा सादर होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Pune Corporation)

 

दरम्यान, पुण्यासह औरंगाबाद (Aurangabad Corporation) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Corporation)
ही हेच कारण सांगत 15 दिवस मुदतवाढ मागितली असून कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

 

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.
यानंतर नोव्हेंबर च्या पहिल्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले.
विशेष असे की हा निर्णय झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
या सततच्या बदलणाऱ्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबींमध्ये विलंब होत गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.
यामुळेच मागील आठवड्यात पुण्यासह तीन महापलीकांनी कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला (state election commission) दिले आहे.

 

दरम्यान 30 नोव्हेंबरची मुदत मंगळवारी अर्थात उद्या संपत आहे. महापलिकाकांडून (Pune Corporation) केलेल्या मागणीवर विचार होऊन निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्याची शक्यता वाढली आहे.

प्रभाग रचनांमध्ये राजकीय हस्तक्षेप ही नवीन गोष्ट राहिली नाही. राज्यात सध्या शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. या तीनही पक्षही राज्यातील विविध महापलिकात बलस्थाने आहेत.
त्यामुळे एकमेकांना जोखत पूर्वी सत्ता असलेल्या महापालिकांत सत्ता स्थापन करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
प्रामुख्याने प्रभाग रचनेपासूनच ही झोम्बाझोम्बी सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने प्रभाग रचना पूर्ण करण्यात प्रशासनापुढे अडचणी येत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

 

Web Title : Pune Corporation | The raw plan of ward formation is still incomplete! Extension to submit plan? pmc elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus | दक्षिण अफ्रिकेवरून आलेल्या डोंबविलीकराच्या कुटुंबातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट आला समोर

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव