Pune Corporation | पुण्यातील धनकवडी ट्रक टर्मिनन्सच्या जागेवर ‘ट्वीन टॉवर्स’ ! ‘एका माननीयांनी’ तयार करून घेतलेल्या आराखड्याचे प्रशासनाने केले सादरीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | धनकवडी (Dhankawadi) येथील ट्रक टर्मिनन्सच्या (rack Terminus in Pune) जागेवर ट्वीन टॉवर (Twin Tower in Pune) उभारून हॉस्पीटल, नर्सिंग होम (Nursing Home in Pune) व कमर्शियल कॉम्प्लेक्सची (Commercial Complex In Pune) पीपीपी (PPP) तत्वावर निर्मिती करण्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) संबधित घटकांची नुकतेच बैठक घेउन त्यामध्ये ‘एका माननीयांनी’ नेमलेल्या सल्लागाराच्या आराखड्याचे प्रेझेंटेशन सादर केले. याप्रसंगी टर्मिनन्समध्ये पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत लीजवर ओटे मिळालेल्या ‘व्यावसायीकांच्या’ शंकांचेही निरसन केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. (Pune Corporation)

पुणे महापालिकेने १९७४ मध्ये भूमी संपादन कायद्यान्वये धनकवडी स.नं. १९ अ/ ४ अ+ब ही ६ एकर १८ गुंठे जागा संपादीत केली आहे. १९९४ मध्ये या जागेवर पुणे सातारा रस्ता (Pune-Satara Road) व पुणे मुंबई रस्ता (Pune-Mumbai Highway) रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या व्यावसायीकांचे पुनर्वसन करण्यात आले. यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण ७६ छोट्या मोठ्या व्यावसायिकांना २२५ चौ. फुटांचे ओटे ९९ वर्षांच्या लीजवर दिले आहेत. हे गाळे लीजवर देताना पुर्वीचाच व्यवसाय सुरू करायचा असे बंधन व्यावसायीकांवर घालण्यात आले. परंतू कालांतराने आणि गरजेनुसार येथील व्यवसायात बदल केला. काहींनी तर पोटभाडेकरू ठेवले. महापालिकेच्या अटींचा भंग केल्याने महापालिकेने नुकतेच येथील ७० व्यावसायीकांना नोटीसही बजावल्या आहेत.

दरम्यान, एका ‘माननीयांनी’ एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून या जागेवर पीपीपी तत्वावर नर्सिंग कॉलेज (Nursing Colleges in Pune) व हॉस्पीटलसाठी एक टॉवर तसेच एक कमर्शियल ‘टॉवर’ अशा ट्वीन टॉवरचा आराखडा तयार करून घेतला व प्रशासनाला सादर केला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच महापालिकेच्या पहिल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या (Pune Corporation) संबधित विभागांच्या अधिकार्‍यांसोबत हा आराखडा करणारी संस्था व टर्मिनन्सच्या जागेवरील व्यावसायीकांनाही बोलविण्यात आले होेते.

यावेळी येथील व्यावसायीकांनी विविध शंका उपस्थित केल्या. यामध्ये प्रामुख्याने गॅरेज व्यावसायीकांनी ट्रक उभे करण्यासाठी जागा, पार्किंगची व्यवस्था, कामे करताना प्रत्यक्षात जागेची गरज या स्वरूपाचे प्रश्‍न व्यावसायीकांनी उपस्थित केले. या प्रश्‍नांना उत्तरे देताना प्रशासनाने गाळ्यांचे आकार कायम ठेवतानाच व्यावसायाला अनुषंगिक सुविधा देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश व्यावसायीकांनीही प्रशासनाच्या भुमिकेचे स्वागत केले अशी माहिती या सादरीकरणाच्यावेळी उपस्थित असलेल्या एका अधिकार्‍याने दिली.

हॉस्पीटल, नर्सिंग कॉलेज उभारा पण नव्याने ‘कमर्शियल’ व्यवसायीक गाळ्यांना विरोध

दक्षिण पुण्याची लोकसंख्या दहा लाखाच्या वर आहे. त्यातुलनेत महापालिकेच्या रुग्णालय व इतर सुविधांसोबतच अन्य शासकिय सुविधांही नाहीत. धनकवडी ट्रक टर्मिनन्सची जागा ही मध्यवर्ती असून अगदी जांभुळवाडी, येवलेवाडी, कोंढवा, सुखसागरनगर, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, बालाजीनगर, सहकारनगर या परिसराच्या मध्यावर आहे. या जागेवर महापालिकेने रुग्णालय आणि नर्सिंग कॉलेज सुरू करावे. तसेच महापालिका व राज्य शासनाच्या सर्व सेवांचे मध्यवर्ती प्रशासकिय कार्यालय एकाच जागेत आणावे. जेणेकरून नागरिकांना महापालिका भवन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या मध्यवर्ती भागात जावे लागणार नाही. या सर्व सुविधांसाठी एवढी मोठी जागा सध्याचे व्यावसायीक वगळता नव्याने कमर्शियल वापरासाठी देणे योग्य होणार नाही. याठिकाणी पीपीपी तत्वावर महापालिकेचे रुग्णालय उभारल्यास दक्षिण पुण्यातील नागरिकांसाठी मोठी मदत होईल. – विशाल तांबे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंगे्रेस पार्टी.

असा आहे आराखडा

दोन ट्वीन टॉवर्समध्ये सुमारे १ लाख २९ हजार चौ.मीटर क्षेत्र निर्माण होणार. सध्याच्या व्यावसायीकांचे याच ठिकाणी पुनर्वसन.
रुग्णालय व नर्सिंग कॉलेजसाठी ४५ टक्के, विकसकासाठी ८ टक्के आणि नव्याने व्यावसायिक गाळ्यांच्या निर्मितीसाठी ३५ टक्के
बांधकाम तर व अन्य सुविधांसाठी २० टक्के क्षेत्र ठेवण्याचे या आराखड्यामध्ये सूचित करण्यात आले आहे.

Web Title : Pune Corporation | ‘Twin Towers’ on the site of Dhankawadi Truck Terminus in Pune! The administration made a presentation on the draft prepared by ‘One Hon’ble’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे