Pune Corporation | यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corporation | पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. जगभरातील विविध भागांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्याकरीता पुणे शहरात वास्तव्य करतात, याचाच विचार करुन केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या परीक्षेच्या पूर्व सराव परीक्षेला दिल्ली येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम आज राबविण्यात येत आहे. कमला नेहरु रुग्णालयात सकाळी १० ते सायं ५ या वेळेत ही मोहीम राबविण्यात येत आहे. Pune Corporation या मोहीमेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

युपीएससीची पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे तसेच पुणे शहरातील बहुसंख्य विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरले आहेत. हे विद्यार्थी पुणे शहरातून दिल्लीत जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना दिल्लीत परीक्षेसाठी जाताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच त्यांचे लसीकरण सुलभरित्या व्हावे यासाठी महापौर (mayor murlidhar mohol) यांच्या पुढाकाने हे लसीकरण आज (बुधवारी) पुणे महापालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटल येथे पाचवा मजला येथे सकाळी १०.०० (दहा ) ते सांयकाळी ०५.००(पाच) वाजता या वेळेत लसीकरण मोहिम आयोजित केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परीक्षेसाठी पात्र असल्याचे योग्य कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘लसीकरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोईचे होईल, तसेच कोव्हिड-१९ च्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या बाधित होण्याचा धोका कमी होईल. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकतील. या भावनेतून आपण ही लसीकरण मोहीम राबवत आहोत. या विशेष मोहिमेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, हे आवाहन’.

Web Title : Pune Corporation | Vaccination Campaign for UPSC Students: Mayor Muralidhar Mohol

Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात

Tokyo Olympics | जर्मन महिला जिम्नास्टच्या कपड्यांनी का वेधले सर्वांचे लक्ष?, जाणून घ्या