Pune Corporation| पुणे मनपात समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणी टंचाई ! ‘राष्ट्रवादी’च्या वतीने महापालिकेत आंदोलन; अतिरिक्त आयुक्तांना प्रतिकात्मक टँकर भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत (Pune Corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप (BJP) अपयशी ठरलं आहे. त्यातही मानवाच्या आयुष्यातील जीवनावश्यक घटक असलेले पाणी पुरवण्याबाबत (Water Supply) सत्ताधारी भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. तात्पुरती सोय म्हणून टँकरने (Tanker) पाणीपुरवठा केला जात होता परंतू सत्ताधाऱ्यांनी आता हे टँकरही बंद केले आहेत. परिणामतः या गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच या गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनाला विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), सचिन दोडके (Sachin Dodke), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Spokesperson Pradip Deshmukh), किशोर कांबळे (Kishore Kamble), मूणालिनी वाणी (Munalini Vani), सुरेश गुजर (Suresh Gujar), बाबुराव चांदेरे (Baburao Chandere), सागर राजे भोसले (Sagar Raje Bhosale), संदीप तुपे (Sandeep Tupe), दिपक बेलदरे (Deepak Beldare) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) नगरसेवक (Corporator), सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Corporation)

 

File photo

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार (Municipal Corporation Additional Commissioner Kunal Khemnar) यांना पाण्याचा प्रतीकात्मक टँकर भेट दिला. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, वास्तविक पाहता ही गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर तातडीने त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाने केवळ जाहिरातबाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. समाविष्ट 23 गावातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे (Smart City) स्वप्न दाखवत तब्बल 34 कोटीचा टॅक्स गोळा करणारी सत्ताधारी भाजपा प्रत्यक्षात नागरिकांच्या प्राथमिक सुविधाही पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे.

File photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असून या समाविष्ट गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यामुळेच अशा प्रकारचं घाणेरडे राजकारण भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक याची नक्की दखल घेतील अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

File photo

 

या आंदोलनास पुणे महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक,
सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचा धिक्कार असो,
पुणेकरांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला होता.
नव्याने समाविष्ट गावांतील अनेक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय राजवटीचा निषेध केला.

 

Web Title : Pune Corporation | Water scarcity in 23 villages included in Pune Municipal Corporation!
Agitation in NCP on behalf of ‘NCP’; Symbolic tanker gift to Additional Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात