Pune Corporation | पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम केंव्हा होणार आणि निवडणुका कधी होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा (PMC Election Model Ward Formation) कार्यक्रम निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केला आहे. 2 मार्चला महापालिकेने (Pune Corporation) हरकती सूचना सुनावणीवरील शिफारशींसह विवरणपत्र आयोगाला पाठवायचे आहे. त्यानंतर प्रभागांची आरक्षण सोडत काढून प्रभाग रचना ग्याझेटमध्ये प्रसिद्ध होणार आहे. ही प्रभाग रचना अंतिम होण्याचा कार्यक्रम कधी होईल याबाबत निवडणूक आयोग स्पष्ट करत नाही तोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम ‘अनिश्चित’च राहणार आहे. (PMC Election Programme)

 

कोरोनामुळे काही प्रमुख महापालिकांच्या (Pune Corporation) निवडणुका एक वर्षापासून प्रलंबित आहेत. तर मार्च मध्ये कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या पुणे, मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमालाही उशीर झाल्याने त्या अद्यापही अनिश्चिततेच्या सावटाखालीच आहेत. बहुचर्चित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करायला तीन महिने विलंब झाला असला तरी ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) निवडणूक कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आयोगाने 1 फेब्रुवारीला प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु निवडणूक आयोग ते कधी अंतिम करणार याचे आदेश अद्याप आलेले नाहीत.

 

 

निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागतो याची प्रतीक्षा जशी राजकीय पक्षांना आहे तशीच ती निवडणूक आयोगाला आहे.
या निकालाचे परिणाम आरक्षण सोडतीवर होणार असल्याने आयोगाकडूनही अस्ते कदम टाकण्यात येत आहेत.

 

दरम्यान, मार्चमध्ये प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
त्यामुळे निवडणुका एप्रिल अथवा मे पर्यंत पुढे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
यामुळे मार्च मध्ये कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या सर्व महापालिकांवर प्रशासक नेमला जाणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Web Title :- Pune Corporation | When will the ward structure of Pune Municipal Corporation be finalized and when will the election be held?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा