Pune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्थानीक नागरिकांनी विरोध करत पेटवून दिलेल्या कात्रज (Katraj) जवळली आंबेगाव (Aambegaon) येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेमध्ये (Pune Corporation) हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश केल्यानंतर तेथिल कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने (Pune Corporation) नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी जुने परंतू बंद असलेल्या प्रकल्पांचा पुनर्विचार सुरू केला असून आंबेगाव प्रकल्प हा त्यापैकी एक असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

पुणे महापालिकेने (Pune Corporation) आंबेगाव येथे मागीलवर्षी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने सुरवातीपासून नागरिकांच्या विरोधाचे कारण ठरलेला हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर विरोधाची धार अधिकच तिव्र झाली. प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नागरिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन करत, कचरा पेटवून दिला. कचर्‍याला लावलेल्या आगीमध्ये प्रकल्पातील यंत्र सामुग्रीचेही नुकसान झाले. प्रक्रिया करण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. या प्रकरणी प्रकल्प पेटवून देणार्‍या नागरिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परंतू एकंदरच नागरिकांची आक्रमकता पाहून प्रशासनानेही काहीकाळ प्रकल्प बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, नुकतेच ३० जून रोजी २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये आंबेगाव व कात्रज परिसरातील गावांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर तेथील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.
मागील काही वर्षात महापालिकेने सुमारे २ हजार ७०० मे. टन क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
परंतू अलिकडच्या काळात सुरू झालेला एकही प्रकल्प अद्याप पुर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही.

याउलट रामटेकडी येथील बंद अवस्थेतील दीशा कंपनीच्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये एक लाख मेट्रीक टनांहून अधिक कचरा साठविण्यात आला आहे.
या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी चढ्या दराने तीन कंपन्यांना काम देण्यात आले आहे.
परंतू चार महिन्यांच्या मुदतीमध्ये या कचर्‍याची विल्हेवाट लागेल याची शक्यता कमीच आहे.
अशा परिस्थितीत नवीन २३ गावांचा कचरा कोठे न्यायचा? असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.
यामुळेच महापालिकेने नवीन प्रकल्प सुरू करणे व ते पूर्ण क्षमतेने सुरू करणे यास विलंब लागणार असल्याने बंद अवस्थेत असलेले प्रकल्पच पुन्हा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली असून आंबेगाव येथील प्रकल्पापासून त्याची सुरूवात केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Web Title :- Pune Corporation | Will the waste processing project at Ambegaon, which was closed due to public protests, be resumed?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या केमिकल पावडरची चोरी

Pune Police | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Bihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच सोडली पतीची साथ, आता साकार करणार स्वप्न