Pune Corporation | पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील 120 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाची ‘वर्क ऑर्डर’ अडकून पडली; महापालिका वर्तुळात ‘उलट सुलट’ चर्चा

पुणे – Pune Corporation | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या (sinhagad road flyover) कामाला मंजुरी मिळून तीन महिने उलटले तरी अद्याप या कामाची वर्क ऑर्डर (Work Order) देण्यात आलेली नाही. सुमारे 120 कोटी रुपयांच्या या कामासाठी पुढील अंदाजपत्रकामध्ये (PMC Budget) आर्थिक तरतूद करण्याबाबतचा (72 ब) प्रस्ताव स्थायी समितीमध्ये (standing committee) मंजुर झाला असून अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे (General Body Meeting) आहे. सिंहगड रस्ता परिसरात अगदी खडकवासला (khadakwasla) पर्यंत राहाणार्‍या लाखो नागरिकांसाठी ‘फायदेशीर’ ठरणार्‍या या पुलाची वर्कऑर्डर का ‘अडकून’ पडली याबाबत मात्र महापालिका (Pune Corporation) वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम (Rajaram Pool to Fun Time) दरम्यान सुमारे दोन कि.मी.चा उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. या कामाची सुमारे ११८ कोटी रुपयांची निविदा (Tender) मंजुर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. भविष्यातील मेट्रो रूटचा (metro route) विचार करूनच उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून पुढील तीन वर्षात हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील या उड्डाणपुला मुळे वेगाने विस्तारलेले खडकवासला, नर्‍हे, धायरी, वडगाव, हिंगणे तसेच पुढील गावांतील नागरिकांना जलद गतीने ये -जा करणे शक्य होणार आहे.

Pune Crime | 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ! ‘गर्भ’ पाडण्यासाठी जबरदस्तीने ‘पपई’ व दिल्या ‘गोळ्या’; बहिण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, या पुलाच्या कामासाठी आर्थिक तरतुद कमी असल्याने ३ ऑगस्ट रोजी पुढील आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर घेण्यात आला. विशेष असे की याच कार्यपत्रिकेवर ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने ऍमेनिटी स्पेस (pune amenity space) भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याची भुमिका घेतल्याने भाजपची गोची झाली. ऍमेनिट स्पेससह महत्वाचे विषय कार्यपत्रिकेवर असल्याने भाजपने सर्व नगरसेवकांना सभेस उपस्थित राहाण्यासाठी व्हिप बजावला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ऍमेनिटी स्पेसच्या भुमिकेमुळे सत्ताधार्‍यांनी ८ सप्टेंबरपर्यंत सभा तहकूब केली. मात्र, ८ तारखेला झालेली सभा कुठलेही कामकाज न होता पुन्हा तहकूब करून २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. अशातच प्रशासनाने उड्डाणपुलाच्या कामासाठी आगामी आर्थिक वर्षात पुरेशी तरतूद न केल्यास कामात मोठ्याप्रमाणावर अडथळे निर्माण होतील व खर्चही वाढेल अशी भुमिका घेत ठेेकेदाराला वर्क ऑर्डर दिली नाही.

केवळ ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रस्तावामुळेच सिंहगड उड्डाणपुलाचे काम मान्यता मिळाल्यानंतरही तीन महिन्यांत सुरू होउ शकले नाही.
त्यामुळेच २२ सप्टेंबरला मान्यता मिळाल्यानंतरच पुढील १५ दिवसांत पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होउ शकणार आहे.
या गदारोळामुळे सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना आणखी किमान चार महिने कामाची प्रतिक्षा करावी तर लागलीच त्याचवेळी पुलाच्या कामाचा खर्च वाढण्याची शक्यतेवर पालिका (Pune Corporation) वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्याची चुकीची क्लिप व्हायरल, चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corporation | Work order for Rs 120 crore flyover on Sinhagad Road in Pune stalled; ‘Ulat Sulat’ discussion in municipal circles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update