Pune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल; शिवसेनेची भुमिका, वाहनचालकांना पाठींबा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   महापालिकेने (Pune Corporation) भाडेतत्वावर नाही तर स्वत: ई व्हेईकल (e vehicle) खरेदी कराव्यात आणि त्याकरीता निविदा प्रक्रीया राबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर महापालिकेच्या (Pune Corporation) वाहन चालकांच्या भुमिकेला शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार (Shiv Sena group leader Prithviraj Sutar) यांनी पाठींबा दर्शविला आहे.

महापालिका प्रशासनाने टाटा कंपनीची नेक्सॉन या ईलेक्ट्रीक कार भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. साधारण ५० गाडया भाडेतत्वावर चालकासह एका खासगी कंपनीच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने स्थायी समिती पुढे ठेवलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे.
तसेच महापालिकेच्या चालकांवर अन्याय करणारा ठरणार आहे.
सदरचा प्रस्ताव ठराविक कंपनी डोळ्यासमोर ठेऊन ठेवला असल्याचा आरोप गटनेते सुतार यांनी केला आहे. महापालिकेचे चालक हे प्रामाणिकपणे व महापालिकेवर निष्ठा ठेऊन काम करीत आहेत
त्यांच्यावर होणारा अन्याय शिवसेना कदापिही सहन करणार नाही.
आमचा या प्रस्तावाला विरोध आहे. मुंबई मनपाच्या पद्धतीने मनपा प्रशासनाने इलेक्ट्रिक
गाड्या भाड्याने न घेता निविदा प्रक्रिया राबवून खरेदी कराव्यात सध्याच्या मनपाच्या
आर्थिक परिस्थितीचा विचार केला
तर गाड्या खरेदी मुळे मनपाचा आर्थिक फायदाच होणार आहे.

तरी सदरचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व गाड्या भाड्याने न घेता गाड्यांची खरेदी
निविदा प्रक्रिया राबवूनच करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुतार यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Corporation | You don’t want to rent an e-vehicle; The role of Shiv Sena, support to drivers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Weather Update | कोकणात पावसाचं पुनरागमन; पुणे, साताऱ्यात हाय अलर्ट जारी

Pune Crime Branch Police | 2 वर्षापासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक