Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corporation | शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या 24 तास पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईनच्या कामांसाठी खोदलेल्या ‘खड्डयांच्या’ भोवतीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पिंगा घालत आहेत. परंतू मागील वर्षभरात व यावर्षी पहिल्या चार महिन्यांत शहरात विविध सेवावाहीन्यांसाठी महापालिकेच्याच (Pune Corporation) परवानगीने तब्बल २२५ कि.मी.चे रस्ते खोदले गेल्याने जवळपास सर्वच भागातील रस्ते खड्डेमय झाल्याचे ते सोयीस्कररित्या विसरून गेले आहेत. याउपर कमाल म्हणजे ‘तुम्हीच खड्डयांची यादी द्या’ असा प्रतिप्रश्‍न करून जबाबदारी झटकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील प्रमुख रस्त्यांपासून अगदी गल्लीबोळांपर्यंतचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. मध्यवर्ती भागात चोवीस तास पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन बदलण्याच्या कामांसाठी खोदलेल्या
खड्डयांनी तर पुणेकरांना कोरोनानंतर हाडांच्या विविध आजारांचीच दुर्देवी भेट दिली आहे.
शिवाजीरस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावर तर समतल रस्त्यापेक्षा खड्डे
आणि ठिगळं लावल्याने वाहतुक अगदी संथ गतिने सुरू आहे.
पावसाळा असल्याने आणि अत्यावश्यक काम असल्याने कामासाठी खोदलेल्या खड्डयांची पावसाळ्यात दुरूस्ती करता येत नसल्याचे कारण सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar) यांनी दिले आहे.

वास्तविकत: महापालिकेच्या पथविभागाकडून (Pune Corporation) माहिती घेतली असता.
मागील आर्थिक वर्ष अर्थात 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात महापालिकेने विविध मोबाईल कंपन्यांच्या ओएफसी केबल, एम.एन.जी.एल.ची गॅस पाईपलाईन, वीज मंडळ,
मेट्रो रेल व पाईपलाईन, ड्रेनेजसाठी तब्बल 202 कि.मी.चे रस्ते खोदाईची परवानगी दिली आहे.
यामधून महापालिकेला तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक खोदाई शुल्कही मिळाले आहे.
तर यावर्षी 1 एप्रिल ते 30 जुलैपर्यंत 11 कि.मी. रस्ते खोदाईला परवानगी दिली आहे.
यातून महापालिकेला 41 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
अशातच महापालिकेला बेकायदा केबल अथवा सेवा वाहीन्या टाकल्याचा संशय असून बेकायदा सेवा वाहीन्या शोधण्यासाठी एजन्सी नेमण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर करून दिला आहे.

 

दरम्यान, ज्या ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवले आहेत, ते एकतर उखडले आहेत किंवा खचले आहेत. हे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar) यांच्या निदर्शनास आणून देउन हे खड्डे कधी बुजवले जाणार आहेत.
याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर डॉ. खेमनार यांनी ‘तुम्हीच खड्डयांची यादी द्या’
असे चमत्कारीक उत्तर देत जबाबदारी झटकून टाकली.

खड्डयांची जबाबदारी कोण घेणार?

महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने कालच महापलिका आयुक्त आमचे ऐकत नाहीत, असे जाहीर केले आहे.
आता अतिरिक्त आयुक्त शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीची जबाबदारी टाळू लागले आहेत.
एकप्रकारे ९७ नगरसेवक असूनही प्रशासन सत्ताधार्‍यांना दाद देत नसल्याने पुणेकरांना त्रासदायक ठरणार्‍या ‘खड्डयांची’ जबाबदारी कोण घेणार अशी ‘निर्णायकी’ परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Web Title : Pune Corporation | ‘You list the potholes on city roads’! Additional Commissioner of Municipal Corporation Dr. Kunal Khemnar shrugged off the responsibility; Pune Municipal Corporation is in a ‘decisive’ stage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक