Pune : मुसळधार पावसामुळे बाधित नागरिकांची नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी घडवुन आणली महापौरांशी भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये अगदी कमी कालावधीत पडलेल्या जास्त पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील अनेक नागरिकांना याचा फटका बसला. अनेकांचे अतोनात नुकसान झाले अनेकांच्या घरांमध्ये व दुकानांत पाणी घुसले. या बाधित नागरिकांना घेऊन आज दीपक नागपुरे यांनी पुणे मनपा येथील महापौर दालन येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने 5 मागण्या करण्यात आल्या.

1) विठ्ठलनगर येथील तडे गेलेली व पडझड झालेली संरक्षक भिंत तातडीने दुरुस्त करण्यात यावी.
2) शिवपुष्प चौक ते सिटीझन बेकरी रस्त्यासाठी सौ नागपुरे यांनी बजेट टाकलेले असून सुद्धा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसून, तो रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा जेणेकरून प्रयेजा सिटी पूल बंद असल्या कारणाने सनसिटी रस्त्यावरील ताण कमी होईल.
3) भा. द. खेर चौक (आनंदनगर चौक) येथील पाटील हॉस्पिटल येथे दोन्ही बाजूने उतार असल्याने पाणी साचून राहते, त्याठिकाणी त्वरित दिवायडर फोडून, लोखंडी बॅरिकेड (राजाराम पुलाच्या धर्तीवर) बसवावेत जेणेकरून पाणी वाहून जाण्यास मदत होईल व शेजारील दुकानांमध्ये पाणी न जाता नुकसान टाळता येईल.
4) विश्रांतीनगर – पाटील हॉस्पिटल येथील नाल्यांची त्वरित पुन्हा एकदा साफ – सफाई करण्यात यावी
5) प्रयेजा सिटी पूल त्वरित दुरुस्त करण्यात यावा.

यावेळी महापौरांनी आपल्या दालनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन वरील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी काय करता येईल ते करावे असे आदेश दिले व वरील प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.