Pune : नगरसेविका परविन हाजी फिरोज यांचा पवित्र रमजान महिन्यात व लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंबांना आधार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे असंख्य कुटुंबांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला असून रोजंदारीवर काम करणार्‍यांचे काम बंद झाले आहे.

पवित्र रमजान महिन्यात कित्येक कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. हे लक्षात घेऊन नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज शेख या दाम्पत्याने गरजू नागरिकांसाठी रेशन किट वाटप सुरु केले आहे.

प्रभागातील ५०० हून अधिक रिक्षाचालकांना अन्नधान्यांचा रेशन कीट वाटप करण्यात आले. प्रभागातील इतर गरजू नागरिकांसाठी दररोजी ३०० रेशन किट वाटप करण्याचा उपक्रम चालू आहे. आतापर्यंत प्रभागात एकूण २ हजार रेशन किटचे वाटप केले आहे.

पोलिसनामा ऑनलाईन ला दिलेल्या मुलाखतीत हाजी फिरोज शेख म्हणाले, ही मदत नसून आमचे कर्तव्यच आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात कोणी उपाशी राहू नये, या भावनेने आम्ही आमच्या परीने एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. इतरांनीही अशा कठीण काळात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे नागरिकांनी वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, जेणे करुन हे संकट लवकरात लवकर संपुष्टात येईल.