Pune : नगरसेवक शंकर पवार यांचे पीएमपी संचालकपदास तूर्तास ‘जीवनदान’; भाजपने पक्षातील नाराजांना ‘गाजर’ दाखवले !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नगरसेवक शंकर पवार (Shankar Pawar) यांचा पीएमपीएमएलच्या संचालकपदाचा राजीनामा हा पीएमपीएमएल कंपनीच्या संचालक मंडळाकडे आलाच नसल्याने पवार (Shankar Pawar) यांना तूर्तास तरी ‘जीवनदान’ मिळाले आहे. मात्र, यानिमित्ताने भाजपचे शहकटशहाचे राजकारण ‘उघड’ झाले असून केवळ पक्षातील नाराजांना चुचकारण्यासाठी पवार यांच्या राजीनाम्याचे ‘गाजर’ दाखविण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी खासदार व भाजपचे विद्यमान प्रदेश उपअध्यक्ष संजय काकडे यांचे समर्थक असलेले नगरसेवक शंकर पवार हे मागील दीड वर्षांपासून पीएमपीएमएलचे संचालक आहेत. महापालिकेत दोन महिन्यांपुर्वी झालेल्या पदाधिकारी बदलांच्या वेळी पवार यांना संचालक पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतू महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हे पदे कायम ठेवण्यात आली. त्यावेळी पवार यांनी राजीनामा देण्यास विरोध केला. दरम्यान, यानंतर काकडे यांना प्रदेश उपाध्यक्ष तसेच त्यांच्या अन्य समर्थकांना स्थायी समितीसह अन्य समित्यांवर संधी देण्यात आली. यामुळे मागील आठवड्यात पवार यांना भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडे राजीनामा सोपविला. जगदीश मुळीक यांनी तो महापौरांकडे पाठविला. महापौरांनी तो पीएमपी कंपनीकडे पाठविला.

दरम्यान, पीएमपी संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये शंकर पवार यांच्या संचालक पदाच्या राजीनाम्याच्या विषयावर चर्चा झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शंकर पवार यांचा राजीनामा कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळापुढे आला नसल्याने स्वीकृत करण्यास नकार दिला. पवार यांचा राजीनामा कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळापुढे आल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी भुमिका घेतली. त्यामुळे तूर्तास तरी शंकर पवार हे संचालक राहाणार असून पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापीकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी नवीन संचालक नियुक्तीची कार्यवाही तुर्त स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

नगरसेवक शंकर पवार यांचा पीएमपीएमएल संचालक पदाचा राजीनामा घेउन त्या जागेवर नाराज सदस्याची वर्णी लावण्यासाठी भाजपच्या शहरातील नेत्यांनी घेतलेली भुमिका खरोखरच ‘न्याय’ देण्याची आहे की आपल्याच नगरसेवकांना ‘गाजर’ दाखविण्याची आहे? अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवीन संचालक नेमला तरी त्याला जेमतेम सहा महिनेच कालावधी मिळणार आहे. अशा परिस्थितीत विनाकारण ‘बदलांचा’ घोळ घालू नये, अशी मागणी मूळ भाजपमधूनच जोर धरू लागली आहे.

 

Also Read This : 

 

गुडघा, कोपराचा काळेपणा घालविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
लेडी सिंघम ! मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी शारदा राऊत डॉमिनिकात दाखल

 

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

 

चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या ‘या’ प्राध्यापकानं केली शरद पवारांवर PhD, पण…

झोपीच्या समस्येमुळं आहात परेशान, ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवू शकतो गाढ झोप, जाणून घ्या